
पुणे, 02 नोव्हेंबर (हिं.स.)।
: पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालयात रिक्षा आणि टॅक्सीचालकांसाठी मराठी भाषा प्रशिक्षण कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. येत्या २३ जानेवारी २०२७ पर्यंत हे प्रशिक्षण दिले जाणार आहे.
राज्यातील अमराठी रिक्षा आणि टॅक्सी परवानाधारक, तसंच चालकांसाठी मराठी भाषेचे प्रशिक्षण अनिवार्य करण्यात आले आहे. यासाठी ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे मराठी भाषा पाठ्यक्रम अभियान’ राबविण्यात येत आहे.
पुणे आरटीओ कार्यालयातील सहकार सभागृहात दररोज दुपारी तीन ते चार या वेळेत चार सत्रांमध्ये हे प्रशिक्षण होणार आहे. प्रशिक्षणानंतर मराठी भाषेच्या व्यावहारिक ज्ञानाची तपासणी करून प्रमाणपत्र दिले जाणार आहे.
इच्छुक चालकांनी आधारकार्ड, वाहन परवाना आणि दोन छायाचित्रांसह संगम ब्रिजजवळील पुणे आरटीओ कार्यालयात उपस्थित राहावे, असे आवाहन सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी विंदा गुरावे यांनी केले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु