झांबिया शिष्टमंडळाची पिंपरी चिंचवड विद्यापीठाला भेट
पुणे, 02 नोव्हेंबर (हिं.स.)। भारत आणि झांबिया यांच्यातील उच्च शिक्षण, संशोधन क्षेत्रातील सहकार्य अधिक दृढ करणे आवश्यक आहे. भविष्यातील शैक्षणिक भागीदारीच्या संधींचा विस्तार करण्यासाठी झांबियाच्या शिष्टमंडळाने पीसीयूमध्ये दिलेली सदिच्छा भेट ही उपयो
Gh


पुणे, 02 नोव्हेंबर (हिं.स.)।

भारत आणि झांबिया यांच्यातील उच्च शिक्षण, संशोधन क्षेत्रातील सहकार्य अधिक दृढ करणे आवश्यक आहे. भविष्यातील शैक्षणिक भागीदारीच्या संधींचा विस्तार करण्यासाठी झांबियाच्या शिष्टमंडळाने पीसीयूमध्ये दिलेली सदिच्छा भेट ही उपयोगी ठरेल असे पीसीयूचे कुलगुरू डॉ. संतोष सोनवणे यांनी सांगितले.

पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या साते, वडगाव मावळ येथील पिंपरी चिंचवड विद्यापीठ येथे आंतरराष्ट्रीय शैक्षणिक सहकार्य दिवस यानिमित्ताने झांबिया सरकारच्या शिष्टमंडळाने भेट दिली. यावेळी क्रेडिटस अँड स्कॉलर शिप्स उपसंचालक डेरिक चिसांगा, क्रेडिट्स अँड स्कॉलरशिप्स व्यवस्थापक फ्लेमिंग मुकोशा, पिंपरी चिंचवड विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संतोष सोनवणे, आंतरराष्ट्रीय संबंध संचालक डॉ. शंकर देवसरकर, संशोधन व विकास संचालक डॉ. भरत काळे, केनया येथील मार्केटिंग मॅनेजर निशा कोटक, आंतरराष्ट्रीय प्रवेश व्यवस्थापक रचना पहुजा, डॉ. रामदास बिरादार आदी उपस्थित होते.

पीसीयू कुलपती तथा पीसीईटी विश्वस्त हर्षवर्धन पाटील, पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्ष पद्माताई भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, व्यवस्थापन समिती सदस्य अजिंक्य काळभोर, नरेंद्र लांडगे, कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली या भेटीचे आयोजन करण्यात आले होते.

या भेटी दरम्यान आंतरराष्ट्रीय शैक्षणिक भागीदारी विकसित करणे, विद्यार्थी व प्राध्यापक आंतरराष्ट्रीय देवाण घेवाण प्रोत्साहन देणे, दोन्ही देशांतील शैक्षणिक संधींचा विस्तार करणे, भारत आणि झांबिया यांच्यात दीर्घकालीन संस्थात्मक सहकार्य विकसित करण्यासाठी भविष्यात सामंजस्य करार करणे याविषयी झाली.

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande