हडपसर-मांजरी प्रभागात २२ गुणवंत विद्यार्थी, ४५ मार्गदर्शक शिक्षकांचा सन्मान
पुणे, 02 नोव्हेंबर (हिं.स.)। पुणे महानगरपालिका शिक्षण विभागाच्या हडपसर-मांजरी प्रभागाच्या वतीने महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत घेण्यात आलेल्या शिष्यवृत्ती परीक्षा २०२६ मध्ये गुणवत्ता यादीत स्थान मिळविणाऱ्या २२ गुणवंत विद्यार्थ्यांचा तसेच त्
Vhj


पुणे, 02 नोव्हेंबर (हिं.स.)।

पुणे महानगरपालिका शिक्षण विभागाच्या हडपसर-मांजरी प्रभागाच्या वतीने महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत घेण्यात आलेल्या शिष्यवृत्ती परीक्षा २०२६ मध्ये गुणवत्ता यादीत स्थान मिळविणाऱ्या २२ गुणवंत विद्यार्थ्यांचा तसेच त्यांच्या यशासाठी मार्गदर्शन करणाऱ्या ४५ शिक्षकांचा सन्मान करण्यात आला. यावेळी शाळांच्या शैक्षणिक गुणवत्तावाढीसाठी प्रयत्नशील असलेल्या उपक्रमशील मुख्याध्यापकांचाही गौरव करण्यात आला.

गोंधळेनगर, हडपसर येथील कै. रामचंद्र आप्पा बनकर इंग्रजी माध्यम विद्यालयात हा सोहळा झाला. इयत्ता चौथी, पाचवी, सातवी व आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षांमध्ये विद्यार्थ्यांनी मिळविलेल्या यशाचे यावेळी कौतुक करण्यात आले.

यावेळी सहाय्यक प्रशासकीय अधिकारी एम. आर. जाधव यांनी शिक्षकांना प्रेरणादायी मार्गदर्शन केले. पर्यवेक्षिका लीला मोरे यांनी प्रास्ताविकातून विद्यार्थ्यांच्या यशाचा आढावा घेत सर्वांचे कौतुक केले. आकांक्षा फाऊंडेशनचे निखिल पाटील, विनोद गोरे, शिक्षक संघटनेचे अध्यक्ष बाळकृष्ण चोरमले तसेच सर्व विषयतज्ज्ञ, मुख्याध्यापक, शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.

विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेला प्रोत्साहन देणे, शिक्षकांच्या योगदानाची दखल घेणे आणि शाळांमध्ये शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी सकारात्मक वातावरण निर्माण करणे, हा या उपक्रमाचा उद्देश आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande