कुलगाम चकमकीतील दहशतवाद्याच्या मृत्यूवर पाकिस्तानी पंतप्रधानांकडून शोक; लतीफ भटला ठरवले ‘शहीद‘
इस्लामाबाद, 20 नोव्हेंबर (हिं.स.)।पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी लष्कर कमांडर लतीफ भटच्या मृत्यूबद्दल तीव्र दुःख व्यक्त करत त्याला ‘शहीद’ संबोधले आहे. लष्कर-ए-तोयबा आणि द रेजिस्टन्स फ्रंट (टीआरएफ) या संघटनांचा सक्रिय दहशतवादी कमांडर लतीफ अह
कुलगाम चकमकीतील दहशतवाद्याच्या मृत्यूवर पाकिस्तानी पंतप्रधानांकडून शोक; लतीफ भटला ठरवले ‘शहीद


इस्लामाबाद, 20 नोव्हेंबर (हिं.स.)।पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी लष्कर कमांडर लतीफ भटच्या मृत्यूबद्दल तीव्र दुःख व्यक्त करत त्याला ‘शहीद’ संबोधले आहे. लष्कर-ए-तोयबा आणि द रेजिस्टन्स फ्रंट (टीआरएफ) या संघटनांचा सक्रिय दहशतवादी कमांडर लतीफ अहमद भट बुधवारी पहाटे काश्मीरमधील कुलगाम येथे सुरक्षा दलांसोबत झालेल्या चकमकीत मारला गेला.

पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी लतीफ भटच्या मृत्यूवर श्रद्धांजली वाहिली. तसेच, त्यांच्या म्हणण्यानुसार अद्याप तुरुंगात असलेल्या काश्मिरी राजकीय नेत्यांचाही उल्लेख केला.

शहबाज शरीफ म्हणाले,“काश्मीरमधील शहीद आणि तुरुंगात कठीण परिस्थितीचा सामना करणाऱ्या काश्मिरी नेत्यांना मी श्रद्धांजली अर्पण करतो. संयुक्त राष्ट्रांच्या ठरावांनुसार काश्मिरी जनतेला आत्मनिर्णयाचा अधिकार मिळेपर्यंत पाकिस्तान त्यांना नैतिक आणि राजनैतिक पाठिंबा देत राहील.”१८ नोव्हेंबर रोजी सकाळी दक्षिण काश्मीरमधील कुलगाम जिल्ह्यातील जंगलपोरा गावात भारतीय सुरक्षा दलांची लष्कर-ए-तोयबाचा कमांडर मोहम्मद लतीफ भट याच्याशी चकमक झाली.

पोलीस अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, भट या ठिकाणी लपल्याची माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा दलांनी संपूर्ण गावाला घेराव घातला. कारवाई सुरू झाली तेव्हा तो एका मशिदीत लपून बसल्याचे सांगितले जात आहे. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सुरक्षा दलांनी त्याला शरण येण्याचे आवाहन केले. यासाठी व्हिडिओ कॉलद्वारेही त्याच्याशी संपर्क साधण्यात आला. मात्र, त्याने शरण येण्यास नकार दिला. त्यानंतर झालेल्या गोळीबारात तो मारला गेला.

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande