निवृत्त अधिकाऱ्याला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल
नाशिक, 21 नोव्हेंबर (हिं.स.)। - मिळकत परत मिळण्यासाठी केलेला दावा व इतर न्यायालयीन प्रकरणे मागे घेण्यासाठी वेळोवेळी होणाऱ्या त्रासाला कंटाळून निवृत्त आरटीओ अधिकाऱ्याने स्वतःच्या डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केल्याप्रकरणी चार जणांविरुद्ध गुन्हा द
निवृत्त अधिकाऱ्याला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल


नाशिक, 21 नोव्हेंबर (हिं.स.)।

- मिळकत परत मिळण्यासाठी केलेला दावा व इतर न्यायालयीन प्रकरणे मागे घेण्यासाठी वेळोवेळी होणाऱ्या त्रासाला कंटाळून निवृत्त आरटीओ अधिकाऱ्याने स्वतःच्या डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केल्याप्रकरणी चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणी योगीता हेमंत हेमाडे (रा. उषाकिरण सोसायटी, संभाजी चौक, नाशिक) यांनी फिर्याद दिली आहे. त्यात म्हटले, की मयत हेमंत हेमाडे यांनी फिर्यादीसोबत पुनर्विवाह केला होता. कुटुंबीयांच्या मालमत्तेवरील फिर्यादी यांचे सर्व हक्क सोडण्यासाठी यश हेमाडे (रा. नेचरर्स ब्लिझ बिल्डिंग, नाशिक, ) भाग्यश्री यश हेमाडे (रा. उषाकिरण सोसायटी, उंटवाडी रोड, नाशिक), मुलगी प्रियंका कुणाल खोपकर (रा. अॅन्टॉप हिल) व यशचे सासरे मल्लिकार्जुन उमदी (रा. नाशिक) यांनी हेमंत हेमाडे यांची फसवणूक करून बळकावलेली मिळकत परत मिळण्यासाठी केलेला दावा व इतर न्यायालयीन प्रकरणे मागे घेण्यासाठी वेळोवेळी धमकावले. शारीरिक, मानसिक व आर्थिक त्रास दिला, तसेच यापुढे न्यायालयात सुनावणीसाठी हजर राहिल्यास फिर्यादी व त्यांच्या पतीसाठी ही शेवटची तारीख असेल, अशी जिवे मारण्याची धमकी दिली. त्यानंतर फिर्यादी व त्यांचे पती हक्क प्राप्त करण्यासाठी न्यायालयातही जाऊ शकत नसल्याने सर्व बाजूंनी कोंडी करून हेमंत हेमाडे यांना आत्महत्येस प्रवृत्त केले. हा प्रकार दि. ८ ऑक्टोबर २०२१ पासून २० नोव्हेंबर २०२६ पर्यंत सुरू होता.

या प्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अहिरराव करीत आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / MANAS CHANDRASHEKHAR GOSAVI


 rajesh pande