
नाशिक, 21 नोव्हेंबर (हिं.स.)।
- लग्नाचे आमिष दाखवून महिलेवर सहा वर्षे लैंगिक अत्याचार करून लग्नास नकार देणाऱ्या इसमाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की आरोपी हसन जामीर सय्यद (रा. मदिनानगर, वडाळा गाव) याने फिर्यादी महिलेला लग्नाचे आमिष दाखवून तिचा विश्वास संपादन केला. त्यानंतर फिर्यादी महिलेला अशोका मार्ग येथे, तसेच वेळोवेळी वेगवेगळ्या लॉजेसवर नेऊन तिच्या इच्छेविरुद्ध तिच्याशी शारीरिक संबंध ठेवून
तिच्यावर बलात्कार केला, तसेच पीडितेने हसन याला लग्नाबाबत विचारले असता त्याने पीडितेला लग्नास नकार देऊन लाथाबुक्क्यांनी मारहाण केली, तसेच संबंध ठेवण्यास नकार दिल्यास पीडितेसह तिच्या दोन्ही मुलींना जिवंत सोडणार नाही, अशी धमकी दिली. हा प्रकार सन २०२१ ते दि. २० नोव्हेंबर २०२६ या कालावधीत घडला. या प्रकरणी पीडितेने दिलेल्या फिर्यादीनुसार मुंबई नाका पोलीस ठाण्यात हसन सय्यदविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक वाघ करीत आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / MANAS CHANDRASHEKHAR GOSAVI