धुळे - अनुदानित खताचा गैरवापर करुन फसवणूक;१८ लाखांच्या ट्रक सह युरियाचा साठाही जप्त
धुळे, 21 नोव्हेंबर, (हिं.स.) अनुदानित रासायनिक खताचा गैरवापर करून शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी सोनगीर पोलिसांनी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या कारवाईत १८ लाख रुपये किमतीचा टाटा कंपनीचा ट्रक तसेच ६७ हजार ५०० रुपये किमतीचे युरिया खत जप्त करण
धुळे - अनुदानित खताचा गैरवापर करुन फसवणूक;१८ लाखांच्या ट्रक सह युरियाचा साठाही जप्त


धुळे, 21 नोव्हेंबर, (हिं.स.) अनुदानित रासायनिक खताचा गैरवापर करून शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी सोनगीर पोलिसांनी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या कारवाईत १८ लाख रुपये किमतीचा टाटा कंपनीचा ट्रक तसेच ६७ हजार ५०० रुपये किमतीचे युरिया खत जप्त करण्यात आले आहे. या प्रकरणी मे. अब्दुल्ला भाई युसूफजी अँड सन्स (शहादा, जि. नंदुरबार) चे मालक मादभाई, राजेंद्र राठोड (रा. वसई-विरार), महावीर कृषी सेवा केंद्र, खांडबारा येथील मालक जितू सुरेश परदेशी आणि मो. ताहीर उतसवर अहमद (रा. जमालुद्दीनपूर, खुटहन, जौनपूर, उत्तर प्रदेश) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पंचायत समितीचे कृषी अधिकारी जगदीश सदाशिव बोराळे (५५) यांनी याप्रकरणी सोनगीर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या फिर्यादीनुसार, १९ नोव्हेंबर २०२६ रोजी लामकाणी (ता.धुळे) चौफुलीजवळ २७० गोण्यांमधील ६७ हजार ५०० रुपये किमतीचे खत आणि टाटा कंपनीचा ट्रक (क्र. एमएच-४८- सीक्यू-९४५७) असा एकूण अंदाजे १८ लाख रुपयांचा मुद्देमाल आढळून आला. शासन अनुदानित रासायनिक खताचा वापर औद्योगिक कारणांसाठी करणे, खताची विक्री अधिकृत पद्धतीने पीओएस मशीनद्वारे न करणे, जिल्ह्याबाहेर खताची विक्री करून स्वत...च्या फायद्यासाठी शासनाच्या अनुदानित खताचा गैरवापर करणे आणि त्यामुळे शासनाचे आर्थिक नुकसान करून फसवणूक केल्याचा आरोप फिर्यादीतून करण्यात आला आहे. या प्रकरणी सोनगीर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता, २०२३ मधील कलम ३१६, ३१८ तसेच इतर संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर


 rajesh pande