रत्नागिरी : गणपतीपुळे मंदिराच्या प्रदक्षिणा मार्गावरील दोन पितळी घंटांची चोरी
रत्नागिरी, 22 नोव्हेंबर, (हिं.स.) । प्रसिद्ध श्री देव गणपतीपुळे (ता. रत्नागिरी) येथील मंदिराच्या प्रदक्षिणा मार्गावरील देवस्थानच्या मालकीच्या दोन पितळी घंटांची चोरी झाल्याचे उघडकीस आले आहे. या दोन्ही घंटांची एकूण किंमत १६ हजार रुपये आहे. मंदिराच्य
रत्नागिरी : गणपतीपुळे मंदिराच्या प्रदक्षिणा मार्गावरील दोन पितळी घंटांची चोरी


रत्नागिरी, 22 नोव्हेंबर, (हिं.स.) । प्रसिद्ध श्री देव गणपतीपुळे (ता. रत्नागिरी) येथील मंदिराच्या प्रदक्षिणा मार्गावरील देवस्थानच्या मालकीच्या दोन पितळी घंटांची चोरी झाल्याचे उघडकीस आले आहे. या दोन्ही घंटांची एकूण किंमत १६ हजार रुपये आहे.

मंदिराच्या प्रदक्षिणा मार्गावरील तळ्याजवळ असलेल्या फायबर शेडच्या लोखंडी बारला साखळीने बांधलेली तीन किलो वजनाची आणि १२ हजार रुपये किमतीची पितळी घंटा चोरट्याने लंपास केली. तसेच प्रदक्षिणा मार्गाच्या उतारावरील पूर्वेकडील देवळी येथे लोखंडी रॉडला अडकवलेली एक किलो वजनाची चार हजार रुपये किमतीची दुसरी घंटाही चोरीला गेली.

या प्रकरणी गणपतीपुळे येथील नीलेश श्रीकृष्ण कोल्हटकर (वय ४९) यांनी जयगड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी


 rajesh pande