जंगल, जमीन आणि पाण्याच्या रक्षणासाठी कर्जतमध्ये मशालीऐवजी मेणबत्त्यांचा लढा!
रायगड, 22 नोव्हेंबर (हिं.स.)। प्रस्तावित टोरेंट पॉवर जलविद्युत प्रकल्पामुळे सह्याद्रीच्या पर्यावरणावर, जंगलसंपत्तीवर, जलस्रोतांवर आणि स्थानिक शेतकऱ्यांच्या जमिनींवर होणाऱ्या संभाव्य परिणामांविरोधात कर्जतमध्ये विविध राजकीय पक्ष, सामाजिक संस्था, शेतक
ल


ह


सही


रायगड, 22 नोव्हेंबर (हिं.स.)। प्रस्तावित टोरेंट पॉवर जलविद्युत प्रकल्पामुळे सह्याद्रीच्या पर्यावरणावर, जंगलसंपत्तीवर, जलस्रोतांवर आणि स्थानिक शेतकऱ्यांच्या जमिनींवर होणाऱ्या संभाव्य परिणामांविरोधात कर्जतमध्ये विविध राजकीय पक्ष, सामाजिक संस्था, शेतकरी संघटना आणि पर्यावरणप्रेमी संघटना एकवटल्या आहेत. रविवारी (२२ नोव्हेंबर) कर्जत येथे सह्याद्री संरक्षण जनजागृती मोहीम आणि कॅण्डल मार्च आयोजित करण्यात आला. या वेळी प्रकल्पाविरोधात नागरिकांच्या सह्या घेण्याची मोहीमही राबविण्यात आली. ॲड. मोरे यांनी या उपक्रमात पुढाकार घेतला.

कर्जत तालुक्यातील प्रस्तावित टोरेंट प्रकल्पासाठी साईडोंगर परिसरात झालेली वृक्षतोड आणि भूसंपादनाच्या प्रक्रियेमुळे स्थानिकांमध्ये नाराजी आहे. भालीवडी, पोटल, आंबोट, पाली आणि साईडोंगर परिसरातील शेतकऱ्यांच्या जमिनींच्या मोजणी व भूसंपादनाच्या नोटिसांनंतर आंदोलनाला अधिक तीव्रता आली आहे. वाढत्या विरोधाच्या पार्श्वभूमीवर २५ नोव्हेंबर रोजी नियोजित जमीन मोजणी प्रशासनाने तूर्तास स्थगित केली आहे. मात्र, प्रकल्प कायमस्वरूपी रद्द करण्याची मागणी आंदोलकांनी कायम ठेवली आहे.

रविवारी सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत कर्जत पोस्ट ऑफिसजवळ जनजागृती मोहीम व सह्याही मोहीम राबविण्यात आली . त्यानंतर सायंकाळी ५.३० वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौक ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक या मार्गावर कॅण्डल मार्च काढण्यात आला. या वेळी सह्याद्रीचे संरक्षण, जंगलसंपत्तीचे संवर्धन, जलस्रोतांचे रक्षण आणि स्थानिकांच्या हक्कांसाठी नागरिकांच्या सह्या घेण्यात आल्या.

या मोहिमेला कर्जत तालुका पर्यावरण बचाव संघर्ष समिती, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), काँग्रेस, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, बहुजन समाज पार्टी, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार), वंचित बहुजन आघाडी, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट), शेतकरी कामगार पक्ष, आजाद समाज पार्टी, शिवसंग्राम तसेच विविध सामाजिक, शेतकरी, पत्रकार, कामगार आणि स्थानिक संघटनांनी पाठिंबा दिला.

यामध्ये आधार जनसेवा सामाजिक संस्था, जागृत कष्टकरी संघटना, भारतीय बौद्ध महासभा, कर्जत रेल्वे पॅसेंजर हक्क समिती, कर्जत शहर बचाव समिती, मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड, चलो साथी क्रांती करे, कर्जत तालुका सकल मराठा समाज, किसान क्रांती संघटना, अॅन्टी करप्शन बोर्ड रायगड, कर्जत प्रेस क्लब, शिलार धरण विरोधी संघर्ष समिती, पोशीर धरण शेतकरी संघटना, पोलीस मित्र संघटना, बाळदिगंबर रिक्षाचालक-मालक संघटना, आगरी समाज संघटना, ग्राम संघर्ष समिती (पाली तर्फे कोथलखलाटी), राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघ, ऑल इंडिया पँथर सेना, माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ, सह्याद्री आदिवासी समाज संघटना, साप्ताहिक रायगडचे वादळ आणि कर्जत रेल्वे पॅसेंजर असोसिएशन यांचा समावेश होता.

विविध राजकीय पक्ष आणि सामाजिक संघटनांनी एकत्र येत दिलेला पाठिंबा पाहता टोरेंट प्रकल्पाविरोधातील आंदोलनाला व्यापक स्वरूप प्राप्त होत आहे. सह्याद्रीचे पर्यावरण, जंगल, पाणी आणि स्थानिक नागरिकांचे हक्क जपण्यासाठी हा लढा पुढेही सुरू ठेवण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.

या माध्यमातून सह्याद्रीचे नैसर्गिक वैभव जपण्यासोबतच स्थानिक शेतकरी, आदिवासी बांधव आणि ग्रामस्थांच्या हक्कांचे संरक्षण करण्याचा संदेश देण्यात आला. टोरेंट प्रकल्पाच्या विरोधातील लढा आता केवळ भूसंपादनापुरता मर्यादित न राहता पर्यावरण आणि स्थानिकांच्या भवितव्याशी जोडला जात असल्याचे या उपक्रमातून स्पष्ट झाले.

---------------

हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)


 rajesh pande