शनिवार २८ नोव्हेंबर रोजी एकविरा गडावर सीकेपी समाजाचा 'एक दिवस कायस्थांचा' मेळा
ठाणे, 22 नोव्हेंबर (हिं.स.)। कार्ला येथील एकविरा गडावर यावर्षी भक्ती आणि शक्तीचा अनोखा संगम होणार आहे. निमित्त आहे ''एक दिवस कायस्थांचा''मेळा. या निमित्ताने देशभरातील सीकेपी बांधव शनिवार दि. २८ नोव्हेंबर २०२६ रोजी एकविरा गडावर जमणार आहेत. सी
शनिवार २८ नोव्हेंबर रोजी एकविरा गडावर सीकेपी समाजाचा 'एक दिवस कायस्थांचा' मेळा


ठाणे, 22 नोव्हेंबर (हिं.स.)। कार्ला येथील एकविरा गडावर यावर्षी भक्ती आणि शक्तीचा अनोखा संगम होणार आहे. निमित्त आहे 'एक दिवस कायस्थांचा'मेळा. या निमित्ताने देशभरातील सीकेपी बांधव शनिवार दि. २८ नोव्हेंबर २०२६ रोजी एकविरा गडावर जमणार आहेत.

सीकेपी समाजाचा 'एक दिवस कायस्थांचा' उत्सव म्हणजे समाजाचा मेळाच आहे. यानिमित्त विविध कार्यक्रम आयोजित केले आहेत. शिवाय ज्ञातीतील नामवंतांचाही गौरव केला जाणार आहे. या गौरव सोहळ्यासाठी विशेष पाहुणे निमंत्रित करण्यात आले आहेत. २८ नोव्हेंबर रोजी पहाटे देवीचा अभिषेक, पालखी, होमहवन, गोंधळ, भक्तीसंगीत, समाजातील नामवंतांचा पुरस्कार देवून गौरव, महाआरती इत्यांदी भरगच्च कार्यक्रम होणार आहेत. सर्व कार्यक्रम गडाच्या पायथ्याशी होणार आहेत. तसेच दादर, पुणे, बोरीवली, ठाणे, कल्याण, डोंबिवली, अंबरनाथ आदी भागातून विशेष बसेची व्यवस्था करण्यात आली असून अनेक एकविरा भक्त २८ नोव्हेंबर रोजी एकविरा गडावर दाखल होणार आहेत.

`एक दिवस कायस्थांचा' या उत्सवाचे यंदा १० वे वर्ष असून या अभिनव संकल्पनेला ज्ञाती बांधवांनी भरभरुन प्रतिसाद दिला आहे. यावर्षी देवीची साडेतीन शक्तीपिठे हा कार्यव्रâम वाघ्या मुरळी, गोंधळ व देवींच्या गाण्यांसह प्राची गडकरी साकारणार आहेत. या समारोहास सीकेपी समाजातील नागरीकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन सीकेपी एकविरा देवस्थान संस्थेने केले आहे. अधिक माहिती व संपर्कासाठी ७०२१३२०१७८ व ९८२०५१८८६३ या नंबरवर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर


 rajesh pande