‘भारत माता की जय’ हेच स्वयंसेवकांच्या कार्याचे प्रेरणासूत्र – रामलालजी
नागपूर, २२ नोव्हेंबर (हिं.स.) : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक कोणत्याही व्यक्तीच्या किंवा संघटनेच्या जयजयकारासाठी नव्हे, तर केवळ ‘भारत माता की जय’ या भावनेने आयुष्यभर कार्य करतात. देश आणि समाजाचा विचार करणारे राष्ट्रभक्त नागरिक घडविणे, हेच
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यकर्ता विकास वर्ग – २ (विशेष)च्या शुभारंभाचे छायाचित्र


नागपूर, २२ नोव्हेंबर (हिं.स.) : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक कोणत्याही व्यक्तीच्या किंवा संघटनेच्या जयजयकारासाठी नव्हे, तर केवळ ‘भारत माता की जय’ या भावनेने आयुष्यभर कार्य करतात. देश आणि समाजाचा विचार करणारे राष्ट्रभक्त नागरिक घडविणे, हेच संघाचे प्रमुख कार्य आहे, असे प्रतिपादन संघाचे अखिल भारतीय संपर्क प्रमुख रामलालजी यांनी केले.

नागपूरच्या रेशीमबाग येथील डॉ. हेडगेवार स्मृतिभवन परिसरातील संत शिरोमणी रविदास सभागृहात आज, रविवारी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यकर्ता विकास वर्ग – २ (विशेष)चा शुभारंभ झाला. यावेळी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. मंचावर सहसरकार्यवाह मुकुंदजी आणि वर्गाचे सर्वाधिकारी तथा छत्तीसगड प्रांत संघचालक डॉ. टोपलाल वर्मा उपस्थित होते. यावेळी रामलालजी यांनी संघाच्या स्थापनेमागील विचार स्पष्ट करताना सांगितले की, देशात राष्ट्रभक्ती, सांस्कृतिक अभिमान आणि सामाजिक एकात्मता रुजविण्याच्या दूरदृष्टीतून डॉ. केशव बलिराम हेडगेवार यांनी संघाची स्थापना केली. संघाच्या शंभर वर्षांच्या प्रवासात अनेक संकटे आली, तीन वेळा संघावर बंदी घालण्यात आली; मात्र स्वयंसेवकांची निष्ठा, कर्मठता आणि चिवटपणा कायम राहिला. काळानुसार संघाच्या कार्यपद्धतीत बदल झाले, तरी मूळ विचार कायम असल्याचे त्यांनी नमूद केले.

प्रशिक्षणातून कार्यकर्त्यांची वैचारिक बैठक अधिक दृढ

कार्यकर्ता विकास वर्गाचे महत्त्व अधोरेखित करताना रामलालजी म्हणाले की, संघाची माहिती असणे पुरेसे नाही, तर संघाचा वैचारिक गाभा समजून घेणे आणि प्रत्येक विषयाचा सखोल अभ्यास करणे आवश्यक आहे. प्रशिक्षण ही एक प्रकारची साधना असून, ती यशस्वीपणे पूर्ण करण्यासाठी दृढ संकल्प आवश्यक आहे. या प्रशिक्षणातून कार्यकर्ते भारतमातेच्या सेवेसाठी अधिक सक्षम होतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.या प्रशिक्षण वर्गात देशभरातून ५०० कार्यकर्ते सहभागी झाले आहेत. १६ डिसेंबरपर्यंत चालणाऱ्या या वर्गाचा समारोप दीक्षांत समारंभाने होणार आहे.

-----------------------------------

हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी


 rajesh pande