
रत्नागिरी, 22 नोव्हेंबर (हिं.स.) । विश्व हिंदू परिषद सामाजिक समरसता आयामातर्फे येत्या गुरुवारी, दि. २६ नोव्हेंबर रोजी भारतीय संविधान दिन कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
हा कार्यक्रम गुरुवारी सायंकाळी साडेपाच वाजता जवाहर चौकातील एसटी स्टॅण्ड पिकअप शेडवरील सभागृहात होणार आहे. या कार्यक्रमात भारतीय संविधान या विषयावर अॅड. विलास कुवळेकर यांचे प्रमुख व्याख्यान होणार आहे.
या कार्यक्रमाला राजापूर शहर व राजापूर तालुक्यातील भारतीय नागरिक बंधू भगिनींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन विश्व हिंदू परिषद सामाजिक समरसता आयाम दक्षिण रत्नागिरी जिल्हा प्रमुख संदेश टिळेकर व वि. हिं. प. राजापूर अध्यक्ष अशोक पाटणकर यांनी केले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी