
रत्नागिरी, 22 नोव्हेंबर, (हिं.स.) । रत्नागिरी व परिसरातील नागरिकांना आधुनिक आणि दर्जेदार नेत्रोपचार सेवा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने इन्फिगो आयकेअर हॉस्पिटलमध्ये येत्या २३ ते २६ नोव्हेंबर या काळात रेटिनासंबंधित आजारांवर सुपर स्पेशालिस्ट डॉक्टरांचे मार्गदर्शन होणार आहे.
या तीन दिवसांमध्ये येणाऱ्या रुग्णांची तपासणी अनुभवी सुपर स्पेशालिस्ट डॉक्टरांकडून करण्यात येणार आहे. डोळ्यांचे विविध आजार, मधुमेहामुळे होणारे डोळ्यांचे विकार, रेटिनासंबंधित समस्या तसेच दृष्टी कमी होण्यामागील कारणांचे निदान करण्यासाठी रुग्णांना तज्ज्ञांचे मार्गदर्शन मिळणार आहे.
मधुमेह असलेल्या रुग्णांनी नियमितपणे डोळ्यांची व रेटिनाची तपासणी करून घेणे अत्यंत आवश्यक आहे. कारण मधुमेहामुळे रेटिनावर परिणाम होऊन दृष्टीला गंभीर धोका निर्माण होऊ शकतो. वेळेवर निदान झाल्यास योग्य उपचारांद्वारे दृष्टीचे संरक्षण करण्यास मदत होऊ शकते.
रेटिनासंबंधित पुढील उपचार किंवा शस्त्रक्रियेची आवश्यकता असलेल्या रुग्णांना त्यांच्या आजारानुसार योग्य उपचारांचे मार्गदर्शन करण्यात येईल. पात्र रुग्णांना महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजना (MJPJAY) अंतर्गत नियमानुसार मोफत उपचार मिळवून देण्यासाठीही सहकार्य करण्यात येईल.
रत्नागिरी जिल्ह्यातील नागरिकांना मोठ्या शहरांमध्ये जाण्याची गरज कमी करून आपल्या जिल्ह्यातच सुपर स्पेशालिस्ट डॉक्टरांकडून तपासणी व मार्गदर्शन मिळावे, हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश आहे. या विशेष संधीचा लाभ रत्नागिरी व आसपासच्या परिसरातील सर्व नागरिकांनी घ्यावा. मधुमेह असलेल्या व्यक्तींनी, ज्येष्ठ नागरिकांनी तसेच डोळ्यांच्या तक्रारी असलेल्या रुग्णांनी या तीन दिवसांत तपासणी करून घ्यावी, असे आवाहन इन्फिगो आयकेअर हॉस्पिटलने केले आहे. अधिक माहिती आणि पूर्वनोंदणीसाठी 9372766504 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी