तुर्किएमध्ये प्रशिक्षणादरम्यान हेलिकॉप्टर कोसळले; पाच सैनिकांचा मृत्यू
अंकारा, 25 नोव्हेंबर (हिं.स.)।पश्चिम तुर्किएमध्ये मंगळवारी संध्याकाळी प्रशिक्षणादरम्यान तुर्किएच्या हवाई दलाचे एक हेलिकॉप्टर कोसळले. या दुर्घटनेत हेलिकॉप्टरमधील पाचही कर्मचारी शहीद झाले. संरक्षण मंत्रालयाने याबाबत माहिती दिली आहे. गेल्या दोन आठवड्
तुर्किएमध्ये प्रशिक्षणादरम्यान हेलिकॉप्टर कोसळले; पाच सैनिकांचा मृत्यू


अंकारा, 25 नोव्हेंबर (हिं.स.)।पश्चिम तुर्किएमध्ये मंगळवारी संध्याकाळी प्रशिक्षणादरम्यान तुर्किएच्या हवाई दलाचे एक हेलिकॉप्टर कोसळले. या दुर्घटनेत हेलिकॉप्टरमधील पाचही कर्मचारी शहीद झाले. संरक्षण मंत्रालयाने याबाबत माहिती दिली आहे.

गेल्या दोन आठवड्यांतील तुर्किएच्या सशस्त्र दलांशी संबंधित ही दुसरी हेलिकॉप्टर दुर्घटना आहे. संरक्षण मंत्रालयाने दिलेल्या निवेदनानुसार, एएस-५३२ कूगर हे हेलिकॉप्टर एस्कीशेहिर येथील हवाई दलाच्या पहिल्या मुख्य जेट तळाच्या कमांड केंद्रातून प्रशिक्षणासाठी उड्डाण केले होते.

निवेदनात म्हटले आहे की, तुर्किएच्या हवाई दलाचे एएस-५३२ प्रकारचे हेलिकॉप्टर एस्कीशेहिर येथून प्रशिक्षणासाठी उड्डाण केल्यानंतर दुर्घटनाग्रस्त झाले. हेलिकॉप्टरच्या अवशेषांपर्यंत बचाव पथक पोहोचले असून, शोध आणि बचावकार्य सुरू करण्यात आले आहे.दरम्यान, या दुर्घटनेत हेलिकॉप्टरमध्ये कार्यरत असलेले हवाई दलाचे पाच शूर जवान शहीद झाल्याची पुष्टी नंतर संरक्षण मंत्रालयाने केली.

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande