कोलंबियात गुन्हेगारांकडून ३५ जणांचे अपहरण करून सुपरमार्केटमध्ये ओलीस; सुरक्षा दल तैनात
बोगोटा, 25 नोव्हेंबर (हिं.स.)।कोलंबियाच्या कार्टाजेना शहरातील एका सुपरमार्केटमध्ये मंगळवारी २५ जणांना ओलीस ठेवल्याची घटना समोर आली आहे. राष्ट्राध्यक्ष अबेलार्दो दे ला एस्प्रिएला यांनी याबाबत माहिती देताना सांगितले की, घटनास्थळी लष्कर आणि पोलिसांचा
कोलंबियात गुन्हेगारांकडून ३५ जणांचे अपहरण करून सुपरमार्केटमध्ये ओलीस; सुरक्षा दल तैनात


बोगोटा, 25 नोव्हेंबर (हिं.स.)।कोलंबियाच्या कार्टाजेना शहरातील एका सुपरमार्केटमध्ये मंगळवारी २५ जणांना ओलीस ठेवल्याची घटना समोर आली आहे. राष्ट्राध्यक्ष अबेलार्दो दे ला एस्प्रिएला यांनी याबाबत माहिती देताना सांगितले की, घटनास्थळी लष्कर आणि पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. ओलीस ठेवण्यात आलेल्यांमध्ये पाच वृद्ध महिलांचाही समावेश होता. त्यांची सुटका करण्यात आली आहे. ‘एक्झितो’ नावाच्या या सुपरमार्केटच्या परिसरात लष्कर आणि पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला होता.

राष्ट्राध्यक्षांच्या माहितीनुसार, एकूण ३५ जणांचे अपहरण करून त्यांना या सुपरमार्केटमध्ये आणण्यात आले होते. या सर्वांचे विलाव्हिसेन्सियो शहरातून अपहरण करण्यात आले होते. या शहरात बॉम्बहल्ला झाल्यानंतर आपण तेथे दौरा केला होता, असेही त्यांनी सांगितले. या घटनेच्या पार्श्वभूमीवर कार्टाजेना येथील राफेल नुनेझ विमानतळावरील विमानसेवा स्थगित करण्यात आली. मात्र, विमानतळाची एक धावपट्टी लष्कराच्या वापरासाठी सुरू ठेवण्यात आली आहे.

दरम्यान, गुन्हेगारांनी मॉलमधून रोख रक्कम घेऊन जाणाऱ्या एका बख्तरबंद वाहनावर ताबा मिळवण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, त्यात अपयश आल्यानंतर त्यांनी नागरिकांचे अपहरण करून त्यांना ओलीस ठेवण्याचा मार्ग अवलंबल्याचे समोर आले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande