
रत्नागिरी, 26 नोव्हेंबर (हिं.स.) । कोकणातील महिलांचे पहिले नमन पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिरात येत्या ७ डिसेंबर रोजी होणार आहे.
रत्नागिरीतील सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, आध्यात्मिक आणि आरोग्य क्षेत्रातील अग्रेसर आभार सांस्कृतिक कला क्रीडा मंडळामार्फत महिला कलाकारांना एकत्र करून त्यांना व्यासपीठ देण्यासाठी माऊली महिला नमन मंडळाची स्थापना करण्यात आली आहे. त्यानिमित्ताने महिला कलाकारांना व्यासपीठ उपलब्ध करण्यात आले आहे. या नमन मंडळाने रत्नागिरी जिल्ह्यातच नव्हे मुंबईत शिवाजी मंदिर येथे जाऊनही प्रयोग केला आहे नुकताच सुवर्णमहोत्सवी प्रयोगही या नमनाचा साजरा झाला. आता ५२वा प्रयोग पुण्यात बालगंधर्व रंग मंदिरात येत्या ७ डिसेंबर रोजी रात्री साडेनऊ वाजता होणार आहे.
या नमनामध्ये नमनसम्राट यशवंत वाकडे यांनी लिहिलेला पौराणिक गण व नटखट गौळण रावणनृत्य असे विविध कला प्रकार सादर होणार आहेत. साईनाथ नागवेकर यांची निर्मिती असलेल्या या प्रयोगाला नी विशेष सहाय्य शरद गोळपकर, दादा वाडेकर, वासुदेव वाघे, सागर मायंगडे, महिला अध्यक्षा सौ. प्रेरणा विलणकर, नेपथ्य संतोष ऊर्फ बावा आग्रे, संगीतसाथ परशुराम घवाळी, साई घवाळी पार्तेज आंबेरकर करत आहेत. गायिका सौ. आकांक्षा वायंगणकर असून सौ. पूनम गोळपकर, सौ .वेदा शेट्ये, सौ. रेश्मा शिदे, सौ. विनया काळप, सौ. तन्वी नागवेकर, सौ. समीक्षा वालम, सौ. रीमा देसाई श्रीमती ज्योती कदम, कु. शिवानी मयेकर, कु. पूर्वा चव्हाण, कु. आदिती पवार, कु. नीरजा जोगळे, बालकलाकार कु. कियारा नागवेकर आदी कलाकार भूमिका साकरत आहेत.
बालगंधर्व रंगमदिरात तिकीटविक्री सुरू असून तिकिटासाठी संपर्क नाना मोहिते (9822001843), बाळासाहेब आरू (992147 9869), श्री. मांडवकर (9922751741), श्री. भुवड (9767427188) यांच्याशी संपर्क , असे आवाहन मंडळाचे सचिव वासुदेव वाघे यांनी केले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी