बँकॉकमध्ये तेल साठवण केंद्राला भीषण आग; स्फोटानंतर परिसर रिकामा करण्याचे आदेश
बँकॉक, 26 नोव्हेंबर (हिं.स.)।थायलंडची राजधानी बँकॉक येथील एका तेल साठवण केंद्राला भीषण आग लागली. माहितीनुसार, घटनास्थळावरून आगीच्या उंचच उंच ज्वाळा उठताना दिसत होत्या. त्यानंतर परिसरात काळ्या धुराचे दाट लोट पसरले. बँगचक तेल साठवण केंद्रात झालेल्या
बँकॉकमध्ये तेल साठवण केंद्राला भीषण आग; स्फोटानंतर परिसर रिकामा करण्याचे आदेश


बँकॉक, 26 नोव्हेंबर (हिं.स.)।थायलंडची राजधानी बँकॉक येथील एका तेल साठवण केंद्राला भीषण आग लागली. माहितीनुसार, घटनास्थळावरून आगीच्या उंचच उंच ज्वाळा उठताना दिसत होत्या. त्यानंतर परिसरात काळ्या धुराचे दाट लोट पसरले. बँगचक तेल साठवण केंद्रात झालेल्या जोरदार स्फोटानंतर ही आग लागली. घटनेनंतर तातडीने प्रशासनाने आसपासच्या परिसरात राहणाऱ्या नागरिकांना सुरक्षित ठिकाणी जाण्याचे निर्देश दिले.

बँगना जिल्हा कार्यालयाने आपल्या फेसबुक पेजवर निवेदन प्रसिद्ध करून बँगचक तेल साठवण केंद्रात स्फोट झाल्याची माहिती दिली.नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने परिसरातील सर्व नागरिकांनी तातडीने हा भाग रिकामा करावा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.पूर्व बँकॉकमध्ये असलेल्या या विशाल तेल साठवण केंद्राचे संचालन थायलंडमधील ऊर्जा क्षेत्रातील कंपनी बँगचक कॉर्पोरेशनकडून केले जाते.

स्फोटानंतर आगीच्या ज्वाळा मोठ्या उंचीपर्यंत पोहोचल्या. तसेच काळ्या धुराचे दाट लोट बँकॉकच्या आकाशात दूरवर पसरले. घटनेची माहिती मिळताच आपत्कालीन वाहनांचे सायरन वाजू लागले. अग्निशमन दल आणि बचाव पथके घटनास्थळाच्या दिशेने रवाना झाली.दरम्यान, या दुर्घटनेत कोणाचाही मृत्यू किंवा जीवितहानी झाल्याचे वृत्त अद्याप समोर आलेले नाही. घटनेनंतर अग्निशमन सेवा आणि स्थानिक जिल्हा कार्यालयाशी तातडीने संपर्क होऊ शकलेला नाही.

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande