
अमरावती, 04 नोव्हेंबर (हिं.स.)। अकोला मार्गावरील पाळा गावालगत न्यु मेहराना शक्ती वेअरहाऊसमधून रात्रीतून सोयाबीनचे ८८२ आणि तुरीचे १२० कट्टे, असा लाखो रुपयांचा शेतमाल चोरी झाल्याची घटना मंगळवारी उजेडात आली.
कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये नामांकित परमानंद सिंघानिया यांनी सिंघानिया दाल अॅण्ड ऑईल मिल फर्मच्या नावाने ८८२ कट्टे सोयाबीन आणि १२० कट्टे तुर विकत घेतल्यानंतर शेतमाल सेंटर वेअरहाऊसमधील न्यु मेहराना शक्ती वेअरहाऊस गोडाऊन क्र. ७ मध्ये ठेवला होता. परंतु दुसऱ्याच दिवशी गोडाऊनमधून चोरी गेल्याची तक्रार त्यांनी बडनेरा ठाण्यात दिली. त्या मालाची किंमत ४० ते ५० लाख असल्याचे पोलिसांना सांगितले. पोलिसांनी गोडाऊनची तसेच परिसरातील सहा सीसीटिव्ही कॅमेऱ्यांची पाहणी केली. पोलिसांना चोरीबाबत संशय निर्माण झाल्याने प्रकरण चौकशीत ठेवले आहे.
चौकशीनंतर निर्णय घेण्यात येणारगोडाऊन सेंटर वेअरहाऊसचे आहे. त्यापैकी एक गोडाऊन अग्रवाल यांच्या मालकीचे आहे गोडाऊनमध्ये माल केव्हा ठेवला होता आणि चोरी गेलेल्या मालाचा विमा आहे का या सर्व बाबी तपासल्या जाणार असल्याचे बडनेराचे ठाणेदार हनुमंत उरलागोंडावार यांनी सांगितले.
--------------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी