
भाजपचे सहा, शिंदेसेनेचे दोन तर ठाकरेसेनेचे दोन उमेदवार निश्चित
नाशिक, ४ नोव्हेंबर (हिं.स.) : नाशिक महानगरपालिकेतील स्वीकृत नगरसेवकपदासाठी राजकीय पक्षांकडून उमेदवारांची नावे निश्चित करण्यात आली आहेत. भारतीय जनता पक्ष, शिवसेना (एकनाथ शिंदे गट) आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) या पक्षांनी आपापल्या उमेदवारांची नावे निश्चित केली आहेत. महापालिकेतील स्वीकृत नगरसेवकपदाच्या एकूण १० जागांपैकी भाजपच्या वाट्याला सहा, तर दोन्ही शिवसेना गटांच्या वाट्याला प्रत्येकी दोन जागा आल्या आहेत.
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाकडून स्वीकृत नगरसेवकपदासाठी हेमंत गायकवाड आणि बाबा गायकवाड यांची नावे निश्चित करण्यात आली आहेत. पक्षाने या दोघांना संधी देण्याचे ठरवले आहे.एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेकडून चंद्रकांत लवटे आणि बाबुराव आढाव यांची नावे स्वीकृत नगरसेवकपदासाठी निश्चित करण्यात आली आहेत. पक्षाच्या वाट्याला आलेल्या दोन जागांसाठी या दोघांची निवड करण्यात आली आहे.भारतीय जनता पक्षाकडून स्वीकृत नगरसेवकपदासाठी सहा उमेदवारांची नावे निश्चित करण्यात आली आहेत. यामध्ये अजित चव्हाण, हेमंत धात्रक, संदीप लेनकर, रोहिणी नायडू, रामहरी सभेराव आणि चंद्रशेखर पंचाक्षरी यांचा समावेश आहे.महापालिकेतील स्वीकृत नगरसेवकपदासाठी तिन्ही पक्षांनी आपापली नावे निश्चित केल्याने आता या नियुक्त्यांकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
स्वीकृत नगरसेवकपदासाठी पक्षनिहाय उमेदवार :
भाजप (६) : अजित चव्हाण, हेमंत धात्रक, संदीप लेनकर, रोहिणी नायडू, रामहरी सभेराव, चंद्रशेखर पंचाक्षरी.
शिवसेना (शिंदे गट) (२) : चंद्रकांत लवटे, बाबुराव आढाव.
शिवसेना (ठाकरे गट) (२) : हेमंत गायकवाड, बाबा गायकवाड.
------------------
हिंदुस्थान समाचार / MANAS CHANDRASHEKHAR GOSAVI