निवृत्तीवेतनधारकांना आता घरबसल्या हयातीचा दाखला सादर करता येणार
रायगड, 04 नोव्हेंबर (हिं.स.)। राज्य शासनाच्या निवृत्तीवेतनधारकांना हयातीचा दाखला सादर करण्यासाठी आता घरबसल्या डिजिटल सुविधा उपलब्ध झाली आहे. केंद्र शासनाच्या कार्मिक, सार्वजनिक तक्रार व निवृत्तीवेतन मंत्रालयाच्या निवृत्तीवेतन व निवृत्तीवेतनधारक कल्
निवृत्तीवेतनधारकांना आता घरबसल्या हयातीचा दाखला सादर करता येणार


रायगड, 04 नोव्हेंबर (हिं.स.)। राज्य शासनाच्या निवृत्तीवेतनधारकांना हयातीचा दाखला सादर करण्यासाठी आता घरबसल्या डिजिटल सुविधा उपलब्ध झाली आहे. केंद्र शासनाच्या कार्मिक, सार्वजनिक तक्रार व निवृत्तीवेतन मंत्रालयाच्या निवृत्तीवेतन व निवृत्तीवेतनधारक कल्याण विभागामार्फत ‘जीवन प्रमाण’ मोबाईल अॅपद्वारे डिजिटल हयातीचा दाखला (Digital Life Certificate) सादर करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

या सुविधेमुळे निवृत्तीवेतनधारकांना कार्यालयात प्रत्यक्ष उपस्थित न राहता मोबाईल अॅपच्या माध्यमातून हयातीचा दाखला सादर करता येणार आहे. त्यामुळे ज्येष्ठ निवृत्तीवेतनधारकांची होणारी धावपळ कमी होण्यास मदत होणार आहे.

रायगड जिल्ह्यातील राज्य शासनाच्या सर्व निवृत्तीवेतनधारकांनी ‘जीवन प्रमाण’ मोबाईल अॅपद्वारे उपलब्ध असलेल्या या डिजिटल सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा कोषागार अधिकारी दीपक बोडके यांनी केले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)


 rajesh pande