
रायगड, 04 नोव्हेंबर, (हिं.स.)। वीर मुरारबाजी देशपांडे शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, महाड येथे मशिनिस्ट व्यवसायासाठी शिल्प निदेशकाचे एक पद कंत्राटी अथवा तासिका तत्त्वावर तात्पुरत्या स्वरूपात भरण्यात येणार आहे. या पदासाठी पात्र व इच्छुक उमेदवारांच्या प्रत्यक्ष मुलाखती १२ व १३ नोव्हेंबर २०२६ रोजी संस्थेत आयोजित करण्यात आल्या आहेत.
या पदासाठी मेकॅनिकल इंजिनिअरिंगमधील पदवी आणि एक वर्षाचा अनुभव किंवा पदविका आणि दोन वर्षांचा अनुभव आवश्यक आहे. तसेच आयटीआय मशिनिस्ट उत्तीर्ण व संबंधित क्षेत्रातील तीन वर्षांचा अनुभव असलेले उमेदवारही पात्र ठरणार आहेत.
इच्छुक उमेदवारांनी शैक्षणिक पात्रता व अनुभवाची मूळ प्रमाणपत्रे आणि त्यांच्या छायांकित प्रतींसह निर्धारित तारखांना संस्थेत उपस्थित राहून मुलाखत द्यावी. निवड झालेल्या उमेदवारांना शासन नियमानुसार मानधन देण्यात येणार आहे.
अधिक माहितीसाठी संस्थेच्या प्राचार्यांशी ९४२३३०३८०२, ७५५९२९४५६९, ९७६९०९७०८४ किंवा ९८२३८६५८४० या क्रमांकांवर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)