अमरावती : राणा दाम्पत्याकडून आतापर्यंत 42 हजार गरजूंना किराणा साहित्याचे वाटप
३ लाख कुटुंबांची दिवाळी गोड करण्याचा संकल्प अमरावती, 04 नोव्हेंबर (हिं.स.)। सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, शेतमजूर, कामगार तसेच आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील प्रत्येक कुटुंबाची दिवाळी आनंदात आणि उत्साहात साजरी व्हावी, या सामाजिक भावनेतून आमदार रवि र
आ. रवि राणा व भाजपा नेत्या मा.खा. नवनीत राणा यांच्या पुढाकारातून 42 हजार 800 गरजू कुटुंबांच्या घरापर्यंत किराणा साहित्याचे वाटप!


३ लाख कुटुंबांची दिवाळी गोड करण्याचा संकल्प

अमरावती, 04 नोव्हेंबर (हिं.स.)। सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, शेतमजूर, कामगार तसेच आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील प्रत्येक कुटुंबाची दिवाळी आनंदात आणि उत्साहात साजरी व्हावी, या सामाजिक भावनेतून आमदार रवि राणा व भाजपा नेत्या तथा माजी खासदार नवनीत राणा यांच्या संकल्पनेतून यंदाही भव्य दिवाळी किराणा वाटप उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गत तब्बल ३ लाख गरजू कुटुंबांपर्यंत दिवाळीचा किराणा पोहोचविण्याचा संकल्प करण्यात आला असून, आतापर्यंत अमरावती शहरातील विविध परिसरांमधील तब्बल 42 हजार 800 गोरगरीब व गरजू कुटुंबांच्या घरापर्यंत दिवाळीच्या किराणा साहित्याचे वाटप करण्यात आले आहे.

दिवाळी हा आनंदाचा, उत्साहाचा आणि एकमेकांच्या सुख-दुःखात सहभागी होण्याचा सण आहे. मात्र, महागाईच्या काळात अनेक गोरगरीब कुटुंबांना सणासुदीच्या दिवसांत आवश्यक किराणा साहित्याची खरेदी करणे आर्थिकदृष्ट्या कठीण होते. अशा परिस्थितीत कोणत्याही गरीब कुटुंबाची दिवाळी अंधारात जाऊ नये, त्यांच्या घरातही आनंदाचा दिवा प्रज्वलित व्हावा, या उद्देशाने आ. रवि राणा व भाजपा नेत्या मा.खा. नवनीत राणा यांनी पुढाकार घेतला आहे. या उपक्रमांतर्गत महाजनपुरा, आनंद नगर, मारुती नगर, गांधी आश्रम, महादेव नगर, छाया कॉलनी, पुरुषोत्तम नगर, महालक्ष्मी नगर, अंबा विहार, अंबा कॉलनी, वल्लभ नगर, पार्वती नगर क्रमांक १ व २, रवि नगर तसेच बडनेरा नवी वस्तीतील पवन नगर, अशोक नगर, हरिदास पेठ, संभाजी नगर, लढ्ढा प्लॉट, मारवाडीपुरा, झंझाडपुरा, लकडगंज, सद्गुरू नगर, शिवाजी नगर यांसह विविध परिसरांतील गरजू कुटुंबांना दिवाळीच्या किराणा साहित्याचे वाटप करण्यात आले आहे. या उपक्रमामुळे हजारो कुटुंबांच्या चेहऱ्यावर आनंद फुलला असून, त्यांच्या दिवाळीचा आनंद द्विगुणित झाला आहे.

विशेष म्हणजे, केवळ ठरावीक ठिकाणी किराणा साहित्याचे वितरण न करता प्रत्येक गरजू कुटुंबाच्या घरापर्यंत दिवाळीचा किराणा पोहोचविण्यावर विशेष भर देण्यात येत आहे. यासाठी आ. रवि राणा व भाजपा नेत्या मा.खा. नवनीत राणा यांनी युवा स्वाभिमान पार्टीचे पदाधिकारी, भाजपा पदाधिकारी तसेच सर्व कार्यकर्त्यांना प्रत्येक परिसरातील पात्र व गरजू कुटुंबांची माहिती घेऊन त्यांच्या घरापर्यंत किराणा साहित्य पोहोचविण्याचे स्पष्ट निर्देश दिले आहेत.समाजातील शेवटच्या घटकापर्यंत मदतीचा हात पोहोचविणे, गरजूंच्या चेहऱ्यावर हास्य फुलविणे आणि प्रत्येक कुटुंबाला सणाचा आनंद घेता यावा, हीच या उपक्रमामागील प्रमुख भावना असून, ३ लाख कुटुंबांपर्यंत दिवाळीचा किराणा पोहोचविण्याचा संकल्प पूर्ण करण्यासाठी हा उपक्रम व्यापक स्वरूपात सुरू आहे.

आ. रवि राणा व भाजपा नेत्या मा.खा. नवनीत राणा यांच्या पुढाकारातून राबविण्यात येणारा हा उपक्रम केवळ किराणा वाटपापुरता मर्यादित नसून, सामाजिक बांधिलकी, माणुसकी आणि गरजूंच्या सुख-दुःखात सहभागी होण्याचा एक सकारात्मक संदेश देणारा ठरत आहे. यावेळी उपमहापौर सचिन भेंडे, गटनेते नाना आमले, नगरसेवक प्रा. प्रशांत आनंदराव वानखडे, नगरसेवक संजय हिंगासपुरे आदी उपस्थित होते.

---------------------------------्र

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande