
पुणे, ५ नोव्हेंबर (हिं.स.) : दिवाळी सणानिमित्त ९ आणि ११ नोव्हेंबर २०२६ रोजी शासकीय सुट्टी जाहीर करण्यात आल्यामुळे एटीएस केंद्र, मोशी येथे या दिवशी वाहनांच्या योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरणाची प्रक्रिया बंद राहणार आहे. त्यामुळे या तारखांना वाहन तपासणीसाठी पूर्वनियोजित वेळ (अपॉइंटमेंट) घेतलेल्या वाहनधारकांनी आपल्या नियोजनात बदल करावा, असे आवाहन प्रादेशिक परिवहन कार्यालय, पिंपरी-चिंचवड यांच्यामार्फत करण्यात आले आहे.
आगामी
९ आणि ११ नोव्हेंबर रोजी योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरणासाठी अपॉइंटमेंट घेतलेल्या वाहनधारकांनी आपली वाहने १४ नोव्हेंबर २०२६ रोजी किंवा त्यानंतरच्या आठवड्यात एटीएस केंद्र, मोशी येथे तपासणीसाठी आणावीत.
संबंधित वाहनधारकांनी या बदलाची नोंद घेऊन वाहनांच्या योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरणासाठी त्यानुसार नियोजन करावे, असे आवाहन प्रादेशिक परिवहन कार्यालय, पिंपरी-चिंचवड यांच्या वतीने करण्यात आले आहे.
---------------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु