पाकिस्तानातील खैबर पख्तूनख्वामध्ये बस-डंपरचा भीषण अपघात; ८ जणांचा मृत्यू, २९ जखमी
इस्लामाबाद , 06 नोव्हेंबर (हिं.स.)।पाकिस्तानच्या वायव्येकडील खैबर पख्तूनख्वा प्रांतात प्रवासी बस आणि डंपर यांच्यात भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत किमान आठ जणांचा मृत्यू झाला असून, २९ जण जखमी झाले आहेत. हा भीषण अपघात अॅबटाबाद मोटारवेवर झाला. अपघातात
8 dead and 29 injured in bus-dumper collision in Khyber Pakhtunkhwa, Pakistan


इस्लामाबाद , 06 नोव्हेंबर (हिं.स.)।पाकिस्तानच्या वायव्येकडील खैबर पख्तूनख्वा प्रांतात प्रवासी बस आणि डंपर यांच्यात भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत किमान आठ जणांचा मृत्यू झाला असून, २९ जण जखमी झाले आहेत.

हा भीषण अपघात अॅबटाबाद मोटारवेवर झाला. अपघातातील मृतांचे मृतदेह आणि जखमींना अयूब टीचिंग रुग्णालयात दाखल करण्यात आले. रुग्णालयाच्या प्रवक्त्याने दिलेल्या माहितीनुसार, आपत्कालीन विभागात सुरुवातीला सात मृतदेह आणि ३० जखमींना आणण्यात आले होते.

दरम्यान, उपचार सुरू असताना आणखी एका व्यक्तीचा मृत्यू झाला. जखमींमध्ये पाच मुले आणि सहा महिलांचा समावेश आहे. रुग्णालय प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, सहा जखमींची प्रकृती गंभीर आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande