रंजीव पुरी यांनी ठरले मिशिगन हाऊसचे पहिले भारतीय-अमेरिकी अध्यक्ष
वॉशिंग्टन , 06 नोव्हेंबर (हिं.स.)।अमेरिकेच्या राजकारणात भारतीय-अमेरिकी समुदायाने आणखी एक ऐतिहासिक कामगिरी केली आहे. डेमोक्रॅटिक पक्षाचे ४२ वर्षीय नेते रंजीव पुरी यांची मिशिगन हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हजच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. या प्रतिष
रंजीव पुरी यांनी ठरले मिशिगन हाऊसचे पहिले भारतीय-अमेरिकी अध्यक्ष


वॉशिंग्टन , 06 नोव्हेंबर (हिं.स.)।अमेरिकेच्या राजकारणात भारतीय-अमेरिकी समुदायाने आणखी एक ऐतिहासिक कामगिरी केली आहे. डेमोक्रॅटिक पक्षाचे ४२ वर्षीय नेते रंजीव पुरी यांची मिशिगन हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हजच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. या प्रतिष्ठित पदावर विराजमान होणारे ते पहिले भारतीय-अमेरिकी ठरले आहेत.

गुरुवारी अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर पुरी यांनी समाजमाध्यमांवर प्रतिक्रिया देताना ही जबाबदारी मोठा सन्मान असल्याचे म्हटले. नवनिर्वाचित सिनेट बहुमत नेते डॅरिन कॅमिलेरी आणि नवनिर्वाचित गव्हर्नर जोसलिन बेन्सन यांच्यासोबत काम करण्यास आपण उत्सुक असल्याचे त्यांनी सांगितले. निवडणूक प्रचारादरम्यान जनतेला दिलेली आश्वासने पूर्ण करण्यासाठी आपण प्रयत्नशील राहणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.पुरी यांनी लिहिले, आज माझ्या सहकाऱ्यांनी माझी मिशिगन हाऊसच्या अध्यक्षपदी निवड केली, हा माझ्यासाठी अत्यंत सन्मानाचा क्षण आहे. माझ्यावर विश्वास दाखवल्याबद्दल सर्व सहकाऱ्यांचे आभार. आता कामाला सुरुवात करण्यासाठी मी पूर्णपणे उत्सुक आहे.

पंजाबी वंशाच्या स्थलांतरित आई-वडिलांच्या पोटी जन्मलेल्या रंजीव पुरी यांनी आपल्या या ऐतिहासिक यशाबद्दल भावना व्यक्त केल्या. ते म्हणाले, माझे आई-वडील जेव्हा या देशात आले, तेव्हा त्यांच्या मुलाने एक दिवस इतिहास घडवेल आणि सर्व अडथळ्यांवर मात करून मिशिगन हाऊसचे नेतृत्व करेल, असे त्यांनी कधी स्वप्नातही पाहिले नसेल. हेच तर अमेरिकेचे खरे आश्वासन आहे.जनतेला दिलेली आश्वासने पूर्ण करण्यासाठी आपण सिनेटचे नवनिर्वाचित बहुमत नेते डॅरिन कॅमिलेरी आणि नवनिर्वाचित गव्हर्नर जोसलिन बेन्सन यांच्यासोबत मिळून काम करणार असल्याचे पुरी यांनी स्पष्ट केले.

रंजीव पुरी यांनी २००८ आणि २०१२ मध्ये अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्या निवडणूक प्रचार मोहिमांमध्ये काम केले होते. त्यानंतर त्यांनी शिकागो विद्यापीठाच्या बूथ स्कूल ऑफ बिझनेस येथून एमबीएची पदवी मिळवली. पुढे ते मिशिगनमध्ये परतले आणि वाहन उद्योगात काम करू लागले.

मिशिगन स्टेट हाऊसमधील तिसऱ्या कार्यकाळात त्यांची रिपब्लिकन पक्षाचे वर्चस्व असलेल्या ११० सदस्यीय प्रतिनिधीगृहातील डेमोक्रॅटिक गटाच्या नेतेपदी नियुक्ती करण्यात आली होती.

रंजीव पुरी यांच्या या ऐतिहासिक यशाबद्दल इंडियन अमेरिकन इम्पॅक्टचे कार्यकारी संचालक चिंतन पटेल यांनी त्यांचे अभिनंदन केले. पुरी यांनी आरोग्यसेवा आणि घरांच्या खर्चात कपात करून सर्वसामान्यांचे जीवन अधिक परवडणारे बनवण्यासाठी सातत्याने काम केले आहे, असे त्यांनी सांगितले.दक्षिण आशियाई समुदायांसह मिशिगनमधील सर्व नागरिकांचे हक्क आणि सुरक्षिततेसाठी पुरी ठामपणे आवाज उठवतील, असा विश्वासही चिंतन पटेल यांनी व्यक्त केला.

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande