
लातूर, 08 नोव्हेंबर (हिं.स.)। शिरूर अनंतपाळ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील श्रीराम फायनान्सशी संबंधित बहुचर्चित प्रकरणात कंपनीचे अधिकारी-कर्मचारी सोमनाथ गंगाधर मेननवार आणि दत्ता सुभाष मुळे या दोघांना न्यायालयाने अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे.
या प्रकरणी गुन्हा क्रमांक ३३९/२०२६ अंतर्गत भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम १०८ सह ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. आरोपींच्या वतीने अतिरिक्त सत्र न्यायालय क्रमांक १, निलंगा येथे फौजदारी जामीन अर्ज क्रमांक १४०/२०२६ दाखल करण्यात आला होता. आरोपींच्या वतीने ॲड. डी. बी. सोळंके आणि ॲड. एस. डी. सोनवणे यांनी न्यायालयात प्रभावी युक्तिवाद केला.
आरोपींच्या वकिलांचा युक्तिवाद ग्राह्य धरत न्यायालयाने दोन्ही आरोपींचा अटकपूर्व जामीन अर्ज मंजूर केला. तसेच, अटकेच्या प्रसंगी न्यायालयाने निर्धारित केलेल्या अटी व शर्तींच्या अधीन राहून प्रत्येक आरोपीला जामिनावर मुक्त करण्याचे आदेश दिले.
न्यायालयाच्या या निर्णयामुळे श्रीराम फायनान्सच्या संबंधित अधिकारी-कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis