कोठे-नरोटे वाद पोलीस ठाण्यापर्यंत; सोलापुरात भाजपच्या तिघांवर गुन्हा दाखल
सोलापूर, 08 नोव्हेंबर (हिं.स.)। आमदार देवेंद्र कोठे आणि काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन नरोटे यांच्यातील राजकीय टीका आणि आरोप-प्रत्यारोपांमधून सुरू झालेला वाद आता वैयक्तिक पातळीवर पोहोचला आहे. दिवाळीच्या काळात या वादाची शहरात चर्चा सुरू असतानाच प्रकरण प
sdfg


सोलापूर, 08 नोव्हेंबर (हिं.स.)। आमदार देवेंद्र कोठे आणि काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन नरोटे यांच्यातील राजकीय टीका आणि आरोप-प्रत्यारोपांमधून सुरू झालेला वाद आता वैयक्तिक पातळीवर पोहोचला आहे. दिवाळीच्या काळात या वादाची शहरात चर्चा सुरू असतानाच प्रकरण पोलीस ठाण्यापर्यंत पोहोचले आहे. काँग्रेस प्रसिद्धी सेलचे प्रमुख तिरुपती परकीपंडला यांच्या फिर्यादीवरून भाजपच्या तीन युवा कार्यकर्त्यांविरोधात जेल रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आमदार देवेंद्र कोठे यांनी खासदार प्रणिती शिंदे यांच्याबाबत आक्षेपार्ह विधान केल्याने संतप्त झालेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांनी काँग्रेस भवनसमोर आंदोलन केले होते. या आंदोलनादरम्यान आमदार कोठे यांच्या प्रतिमेला जोडे मारून निषेध व्यक्त करण्यात आला होता.

या घटनेनंतर भाजपचे तीन कार्यकर्ते तिरुपती परकीपंडला यांच्या घरासमोर गेले. आपण आमदार कोठे यांच्या सांगण्यावरून आलो असल्याचे सांगत त्यांनी आंदोलनात सहभागी झाल्याबद्दल परकीपंडला यांना जाब विचारला. तसेच, आमदारांविरोधात आंदोलन करू नका आणि त्यांच्या नादी लागल्यास परिणाम भोगावे लागतील, अशी धमकी दिल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे.

याशिवाय, फेसबुक आणि व्हॉट्सॲपवर आमदार कोठे यांच्याशी संबंधित टाकलेल्या पोस्ट हटविण्याची मागणी करण्यात आली. पोस्ट हटवल्या नाहीत, तर बघून घेण्याची धमकी देत शिवीगाळ आणि दमदाटी केल्याचेही फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

या तक्रारीच्या आधारे जेल रोड पोलिसांनी तीन युवा कार्यकर्त्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande