बीसीसीआयपासून विराट कोहलीपर्यंत... क्रिकेटपटूंनी दिल्या दिवाळीच्या शुभेच्छा
नवी दिल्ली, ८ नोव्हेंबर (हिं.स.)भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय), भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर, विराट कोहली आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (आयसीसी) चे अध्यक्ष जय शाह यांनी दिवाळीच्या शुभप्रसंगी शुभेच्छा दिल्या आहेत. सर्वां
विराट कोहली


नवी दिल्ली, ८ नोव्हेंबर (हिं.स.)भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय), भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर, विराट कोहली आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (आयसीसी) चे अध्यक्ष जय शाह यांनी दिवाळीच्या शुभप्रसंगी शुभेच्छा दिल्या आहेत. सर्वांनी सोशल मीडियाद्वारे प्रेम, आनंद आणि बंधुत्वाचे संदेश शेअर केले.

बीसीसीआयने आपल्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंट 'एक्स' वरून शुभेच्छा देताना लिहिले आहे, सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा.

भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांनी 'एक्स' या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट करत लिहिले, आम्ही मोठे विजय मिळवण्यासाठी खेळतो - अब्जावधी हृदयांसाठी. सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा.

विराट कोहलीने त्याच्या सोशल मीडियावर लिहिले, प्रकाशाचा हा सण तुमच्या जीवनात आनंद, समृद्धी आणि भरपूर सकारात्मकता घेऊन येवो. तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबियांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा.

बीसीसीआयचे माजी सचिव आणि आयसीसीचे अध्यक्ष जय शाह यांनीही सोशल मीडियाद्वारे दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. त्यांनी 'X' वर लिहिले की, प्रकाशाचा हा सण शांतता, प्रगती आणि समृद्धीने भरलेले भविष्य घडवण्याचा आपला निर्धार अधिक दृढ करो. सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा.

माजी महान फलंदाज युवराज सिंग यांनी 'एक्स' वर शुभेच्छा देताना लिहिले, तुमचे घर नेहमी प्रेमाने, तुमचे हृदय आनंदाने आणि तुमचे आयुष्य खऱ्या अर्थाने महत्त्वाच्या क्षणांनी भरलेले राहो. तुम्हाला आणि तुमच्या प्रियजनांना उत्तम आरोग्य, शांती आणि हसण्याची असंख्य कारणे मिळोत.

इंग्लंडचा माजी फलंदाज केविन पीटरसननेही त्याच्या भारतीय मित्रांना आणि चाहत्यांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. त्याने लिहिले, या अत्यंत आनंददायी प्रसंगी, माझ्या सर्व अद्भुत मित्रांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा! मला आशा आहे की तुमचा हा सण प्रेम, हास्य आणि मजेने भरलेला असेल.

---------------

हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे


 rajesh pande