
रत्नागिरी, 08 नोव्हेंबर (हिं.स.) । खेड येथील रोटरी इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी वैज्ञानिक क्षेत्रात उल्लेखनीय यश संपादन केले आहे. स्पंदन शर्वरी गौरव धामणे आणि अर्णव मंजुश्री स्वप्नील परकाळे यांनी तयार केलेल्या ‘Cashewshellora’ या वैज्ञानिक प्रकल्पाची १४ ते १९ डिसेंबरदरम्यान पुडुचेरी येथे आयोजित करण्यात येणाऱ्या ५३व्या राष्ट्रीय बाल विज्ञान प्रदर्शनासाठी निवड झाली आहे.
‘Cashewshellora’ हा प्रकल्प साकारण्यासाठी स्पंदनला सौ. शर्वरी गौरव धामणे, डॉ. गौरव शिवराम धामणे, वैभव बुर्शे, सौ. मीना कोळपे, गौरव आंब्रे, प्रसाद सावंत, राहुल चव्हाण, ओंकार काष्टे, योगेश गुरव तसेच पालकर फार्म, विघ्रवली यांचे मोलाचे सहकार्य लाभले. स्पंदन धामणे याने गेल्या वर्षीही राष्ट्रीय स्तरावर मजल मारली होती.
या उल्लेखनीय यशाबद्दल रोटरी इंग्लिश मीडियम स्कूल व रोटरी प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. उपेंद्र तलाठी यांच्यासह अन्य मान्यवरांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
सलग दुसऱ्या वर्षी राष्ट्रीय स्तरावर झेप घेणाऱ्या स्पंदनचे आणि अर्णवचे हे यश खेड तालुक्यासह रत्नागिरी जिल्ह्याच्या शैक्षणिक व वैज्ञानिक क्षेत्रासाठी अभिमानास्पद ठरले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी