भाजप दक्षिण रत्नागिरी पदवीधर सेलतर्फे सोमवारी 'स्वर दीपावली' संगीतमय कार्यक्रम
रत्नागिरी, 08 नोव्हेंबर (हिं.स.) । भाजप दक्षिण रत्नागिरी पदवीधर सेलतर्फे दीपावलीच्या निमित्ताने ''स्वर दीपावली'' या संगीतमय कार्यक्रमाचे आयोजन सोमवार, दि. 9 नोव्हेंबर रोजी सायंकाळी साडेसहा वाजता स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर नाट्यगृहात करण्यात आल
भाजप दक्षिण रत्नागिरी पदवीधर सेलतर्फे सोमवारी 'स्वर दीपावली' संगीतमय कार्यक्रम


रत्नागिरी, 08 नोव्हेंबर (हिं.स.) । भाजप दक्षिण रत्नागिरी पदवीधर सेलतर्फे दीपावलीच्या निमित्ताने 'स्वर दीपावली' या संगीतमय कार्यक्रमाचे आयोजन सोमवार, दि. 9 नोव्हेंबर रोजी सायंकाळी साडेसहा वाजता स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर नाट्यगृहात करण्यात आले आहे.

हा संगीतमय कार्यक्रम भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण , कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार ॲड. निरंजन डावखरे, खासदार नारायण राणे, मस्त्यव्यवसाय मंत्री नितेश राणे यांच्या नेतृत्वाखाली व आमदार प्रमोद जठार, जिल्हाध्यक्ष प्रशांत यादव, जिल्हा महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष वर्षाताई ढेकणे, शहर अध्यक्ष दादा ढेकणे यांच्या मार्गदर्शनाखाली होत आहे.

मैफलीत अभंग, भावगीत व प्रसिद्ध भक्तिगीते सादर होणार असून रत्नागिरीतील सुप्रसिद्ध गायिका ईशानी पाटणकर व सुप्रसिद्ध अभिनेता व गायक अमोल बावडेकर सर्व रसिकांना मंत्रमुग्ध करणार आहेत.

हा कार्यक्रम मोफत असून या कार्यक्रमाला देसाई बंधू आंबेवाले व रत्नागिरीच्या नगराध्यक्ष सौ. शिल्पाताई सुर्वे, उपनगराध्यक्ष समीर तिवरेकर यांच्यासह पालिकेचे सहकार्य लाभणार आहे. जास्तीत जास्त रत्नागिरीकरांनी कार्यक्रमाला उपस्थित राहावे, असे आवाहन दक्षिण रत्नागिरी जिल्हा पदवीधर सेलचे अध्यक्ष मनोज पाटणकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी केले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी


 rajesh pande