पाकिस्तानमध्ये पोलिस ठाणे आणि कस्टम कार्यालयावर हल्ला; दोघांचा मृत्यू
इस्लामाबाद , 18 फेब्रुवारी (हिं.स.)।पाकिस्तानमधील डेरा इस्माईल खान येथे बुधवारी बंडखोरांनी यारिक पोलिस ठाणे आणि जवळील सीमाशुल्क (कस्टम्स) कार्यालयावर हल्ला केला. हल्लेखोरांनी स्वयंचलित शस्त्रांनी जोरदार गोळीबार केला, त्यामुळे परिसरात गोंधळ उडाला. य
पाकिस्तानमध्ये पोलिस ठाणे आणि कस्टम कार्यालयावर  हल्ला; दोघांचा मृत्यू


इस्लामाबाद , 18 फेब्रुवारी (हिं.स.)।पाकिस्तानमधील डेरा इस्माईल खान येथे बुधवारी बंडखोरांनी यारिक पोलिस ठाणे आणि जवळील सीमाशुल्क (कस्टम्स) कार्यालयावर हल्ला केला. हल्लेखोरांनी स्वयंचलित शस्त्रांनी जोरदार गोळीबार केला, त्यामुळे परिसरात गोंधळ उडाला. या हल्ल्यात दोन अधिकारी ठार झाले तर आणखी दोघे जखमी झाले.

पोलिसांच्या माहितीनुसार, मृतांमध्ये सीमाशुल्क अधिकारी इसरार खान आणि पोलिस कॉन्स्टेबल मोहम्मद बिलाल यांचा समावेश आहे. जखमींची ओळख हजरत उमर आणि खयाल मोहम्मद अशी झाली असून त्यांना जिल्हा मुख्यालय रुग्णालयातील ट्रॉमा सेंटरमध्ये दाखल करण्यात आले आहे आणि त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

हल्लेखोरांनी पोलिस ठाणे आणि सीमाशुल्क कार्यालयावर एकाच वेळी हल्ला केला. हा हल्ला चीन-पाकिस्तान आर्थिक कॉरिडॉर (सीपीईसी) मार्गावर झाला असून सुरक्षा दृष्टीने हा भाग अत्यंत संवेदनशील मानला जातो. हल्लेखोरांनी सीपीईसी मार्गावर धावणाऱ्या प्रवासी बसांवरही गोळीबार केल्याने प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. हल्ल्यादरम्यान एका सीमाशुल्क वाहनाला आग लावण्यात आली. सुरक्षा दलांनी तत्काळ प्रत्युत्तर दिले. पोलिसांच्या गोळीबारानंतर बंडखोर घटनास्थळावरून पळून गेले. त्यानंतर मोठ्या संख्येने पोलिस दल तिथे पोहोचले आणि आसपासच्या भागात शोधमोहीम सुरू करण्यात आली.

या महिन्याच्या सुरुवातीलाच पनियाला येथील वांडा बुढ परिसरात बंडखोरांनी पोलिस पथकावर हल्ला केला होता. त्या हल्ल्यात किमान चार पोलिसांचा मृत्यू झाला होता, ज्यामध्ये एका स्टेशन हाऊस ऑफिसर (एसएचओ) चा समावेश होता.१८ जानेवारी रोजी जिल्ह्यातील एका लग्न समारंभादरम्यान स्फोट झाला होता, ज्याला आत्मघाती हल्ला मानले गेले. त्यात शांतता समितीच्या एका नेत्यासह पाच जणांचा मृत्यू झाला होता आणि आणखी दहा जण जखमी झाले होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande