माजी ब्रिटिश प्रिन्स अँड्र्यू माउंटबॅटन यांना अटक
लंडन, 19 फेब्रुवारी (हिं.स.) ब्रिटनचे राजा किंग चार्ल्स यांचे छोटे भाऊ, पूर्व प्रिंस अँड्र्यू माउंटबॅटन-विंडसर यांना सत्तेचा गैरवापर केल्याबद्दल अटक करण्यात आली. पण एपस्टाईन फाइल्समध्ये त्यांचे नाव आल्यानंतरच त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे.
माजी ब्रिटिश प्रिन्स अँड्र्यू माउंटबॅटन


लंडन, 19 फेब्रुवारी (हिं.स.) ब्रिटनचे राजा किंग चार्ल्स यांचे छोटे भाऊ, पूर्व प्रिंस अँड्र्यू माउंटबॅटन-विंडसर यांना सत्तेचा गैरवापर केल्याबद्दल अटक करण्यात आली. पण एपस्टाईन फाइल्समध्ये त्यांचे नाव आल्यानंतरच त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे. ज्यामुळे त्यांचा एपस्टाईन फाइल्सशी संबंध असल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. अलीकडेच त्यांचे फोटो समोर आले आहेत. ज्यामुळे त्यांच्यावरील आरोप आणखी गडद झाले आहेत.

गेल्या वर्षी, आठवडाभर चाललेल्या चौकशीनंतर, अँड्र्यू माउंटबॅटन-विंडसरची प्रिन्स चार्ल्स म्हणून पदवी काढून घेण्यात आली. शिवाय, त्यांना रॉयल लॉज हवेली सोडण्यास भाग पाडण्यात आले. बकिंगहॅम पॅलेसने चौकशी दरम्यान एक निवेदन जारी केले, ज्यामध्ये असे म्हटले होते की, राजाचा भाऊ आता अँड्र्यू माउंटबॅटन-विंडसर म्हणून ओळखला जाईल.

पोलिसांनी अँड्र्यू माउंटबॅटन-विंडसर यांना त्यांच्या ६६ व्या वाढदिवशीच अटक केली. आज सकाळी ८ वाजता त्यांना अटक करण्यात आली. त्यांना अटक करण्यासाठी वाहनांच्या ताफ्यासह पोलिस त्यांच्या घरी पोहोचले आणि त्यांना सोबत घेऊन गेले.

पोलिसांचे अधिकृत निवेदन

थेम्स व्हॅली पोलिसांनी सांगितले की, चौकशीदरम्यान आज (१९ फेब्रुवारी) नॉरफोक येथील सुमारे ६६ वर्षांच्या एका व्यक्तीला सार्वजनिक पदाचा गैरवापर (misconduct in public office) केल्याच्या संशयावर अटक करण्यात आली आहे. बर्कशायर आणि नॉरफोकमधील काही ठिकाणी तपासणीही सुरू आहे. सध्या या प्रकरणाची चौकशी सुरू आहे, त्यामुळे लोकांना बातम्या प्रकाशित करताना न्यायालयाचा अवमान टाळण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

एपस्टाईनशी असलेल्या संबंधांमुळे पुन्हा एकदा चर्चेत आलेले माजी प्रिन्स अँड्र्यू माउंटबॅटन-विंडसर यांनी वारंवार आरोप नाकारले आहेत. पोलीस सध्या अँड्र्यूंवरील आरोपांची चौकशी करत आहेत. माउंटबॅटन-विंडसर यांनी गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये त्यांचा भाऊ राजा यांच्याशी चर्चा केल्यानंतर ड्यूक ऑफ यॉर्कची पदवी आणि सन्मान सोडण्याची घोषणा केली होती. त्यानंतर त्यांच्याकडून त्यांच्या राजकन्या पदव्या काढून घेण्यात आल्या आणि त्यांना राजघराणे सोडण्यास सांगण्यात आले. शिवाय, माउंटबॅटन-विंडसर यांच्या लष्करी पदव्या देखील मागे घेण्यात आल्या आहेत.

लैंगिक शोषणाच्या आरोपांनंतर त्यांच्याकडून आधीच सर्व लष्करी पदव्या आणि राजघराण्यातील मानमरातब काढून घेण्यात आले होते. मात्र, आता त्यांना थेट अटक झाल्याने जगभरात खळबळ उडाली आहे. किंग चार्ल्स यांच्या राज्याभिषेकानंतर राजघराण्यासमोर आलेले हे आतापर्यंतचे सर्वात मोठे संकट मानले जात आहे. या अटकेमुळे केवळ ब्रिटनमध्येच नाही, तर संपूर्ण जगात ब्रिटिश राजघराण्याच्या नैतिकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. 'पब्लिक ऑफिसचा गैरवापर' केल्याचा ठपका ठेवत लंडन पोलिसांनी ही कारवाई केली आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे


 rajesh pande