कराचीमध्ये सिलेंडरच्या स्फोटानंतर तीन मजली इमारत कोसळली, १६ जणांचा मृत्यू
कराची, 19 फेब्रुवारी (हिं.स.) पाकिस्तानमधील कराचीमध्ये एक मोठी दुर्घटना घडली. सिलेंडरच्या स्फोटामुळे एक निवासी इमारत कोसळली. ढिगाऱ्याखाली सोळा जणांचा मृत्यू झाला आणि ते ढिगाऱ्याखाली गाडले गेले. तर अनेक जण जखमी झाले आहे. स्थानिक माध्यमांनी पोलिस आणि
कराचीमध्ये सिलेंडरच्या स्फोटानंतर तीन मजली इमारत कोसळली


कराची, 19 फेब्रुवारी (हिं.स.) पाकिस्तानमधील कराचीमध्ये एक मोठी दुर्घटना घडली. सिलेंडरच्या स्फोटामुळे एक निवासी इमारत कोसळली. ढिगाऱ्याखाली सोळा जणांचा मृत्यू झाला आणि ते ढिगाऱ्याखाली गाडले गेले. तर अनेक जण जखमी झाले आहे. स्थानिक माध्यमांनी पोलिस आणि स्थानिक बचाव पथकांचा हवाला देत ही माहिती दिली. कराचीच्या सोल्जर बाजारातील गुल राणा कॉलनी परिसरातील एका घरात ही घटना घडली.

पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले की, गॅस सिलेंडर गळतीमुळे स्फोट झाला. सेहरीच्या वेळी पहाटे ४:१५ च्या सुमारास ही घटना घडली आणि इमारतीच्या पहिल्या मजल्यावर गॅसचा स्फोट झाला. आपत्कालीन सेवांनी ढिगाऱ्यातून अनेक लोकांना बाहेर काढले आणि त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. सहा महिला आणि चार मुलांसह एकूण १६ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. तर चौदा जण जखमी झाले आहेत. सिव्हिल हॉस्पिटलमधील ट्रॉमा सेंटरचे संचालक डॉ. मोहम्मद साबीर मेमन यांच्या मते, १३ मृतदेह त्यांच्या रुग्णालयात आणण्यात आले आहेत.

शोध आणि बचाव कार्य सुरू आहे. या परिसराच्या गर्दीमुळे अधिकाऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला. इमारतीत कमी खोल्यांमुळे बचाव पथकांना अडचणी येत होत्या. अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की, ही इमारत कायदेशीर रचना नव्हती आणि ती वेगवेगळ्या खोल्या जोडून बांधण्यात आली होती. जवळपासच्या इतर घरांचेही मोठे नुकसान झाले आहे. पोलिसांनी परिसराला वेढा घातला आहे आणि सुरक्षा व्यवस्था कडक केली आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे


 rajesh pande