नाशिक विभागातून २ लाख ६ हजार ६११ विद्यार्थी देणार दहावीची परीक्षा
10th class exam from today;
नाशिक विभागातून २ लाख ६ हजार ६११ विद्यार्थी देणार दहावीची परीक्षा


नाशिक, 19 फेब्रुवारी (हिं.स.)।

: बारावीपाठोपाठ इयत्ता दहावीच्या परीक्षेला आज शुक्रवारी (दि. २०) प्रारंभ होत आहे. पहिल्या दिवशी मराठीसह इतर विविध भाषा विषयांची परीक्षा होणार असून, नाशिक विभागातून २ लाख ६ हजार ६११ विद्यार्थी परीक्षेला सामोरे जाणार आहेत.

१८ मार्चपर्यंत चालणाऱ्या या परीक्षेत विविध विषयांच्या लेखी पेपरला विद्यार्थी सामोरे जातील, मौखिक परीक्षा यापूर्वीच पार पडली आहे, तर प्रात्यक्षिक परीक्षाही आठ दिवसांपूर्वी संपल्या आहेत.इयत्ता बारावीप्रमाणे दहावीच्या परीक्षेत गैरप्रकार टाळण्यासाठी शिक्षण मंडळ, शिक्षण विभागाने नियोजन केले असून, भरारी पथकांसह तिसऱ्या डोळ्याची नजर या केंद्रांवर ठेवण्यात येणार आहे. कॉपी केस आढळणाऱ्या केंद्रांची मान्यता रद्द करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. संवेदनशील केंद्रांवर पोलिस बंदोबस्त तैनात करण्यासह भरारी पथकांच्या फेऱ्याही वाढविल्या जाणार आहेत.

मंडळाची संपूर्ण प्रशासकीय तयारी पूर्ण परीक्षा आयोजनासंदर्भात शिक्षण झालेली आहे. तसेच शाळांकडून आसन व्यवस्थादेखील जाहीर केली जाते आहे.

अर्धा तास आधी उपस्थिती आवश्यक विद्यार्थ्यांना परीक्षेच्या वेळेच्या अर्धा तास आधी परीक्षा केंद्रावर उपस्थित राहावे लागणार आहे. सकाळ सत्रातील परीक्षेत सकाळी साडेदहाला पहिला गजर होईल व विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रात प्रवेश दिला उत्तरपत्रिकांचे वाटप केले जाणार आहे. जाईल. १० वाजून ५० मिनिटांनी अकराला प्रश्नपत्रिका वाटप केले जाईल.

---------------

हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV


 rajesh pande