
रत्नागिरी, 19 फेब्रुवारी, (हिं. स.) : डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. संतोष सावर्डेकर यांनी झाडगाव येथील सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्राला भेट देऊन प्रशासकीय बाबी आणि संशोधन आणि विस्तार कार्याचा आढावा घेतला. त्यानंतर त्यांनी संशोधन केंद्रातील अधिकारी व कर्मचारीवर्गाला मार्गदर्शन केले.
सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्राचे वरिष्ठ वैज्ञानिक अधिकारी डॉ. केतन चौधरी यांनी डॉ. सावर्डेकर यांचे स्वागत केले. कुलसचिवांनी संशोधन केंद्राच्या झाडगाव येथील प्रशासकीय बाबी, मत्स्यालय व मत्स्यसंग्रहालय, विस्तार शिक्षण आणि संशोधन कार्याचा थोडक्यात आढावा घेतला.यावेळी सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्राचे सहयोगी संशोधन अधिकारी डॉ. आसिफ पागरकर, अभिरक्षक डॉ. हरीश धमगाये, प्रा. नरेंद्र चोगले व प्रा. सचिन साटम, व्ही. आर. सदावर्ते व अपूर्वा सावंत, जाई साळवी उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी