लातूरात शिवजयंतीनिमित्त १०१ शिवप्रेमी युवकांनी रक्तदान करून केले अभिवादन
लातूर, 19 फेब्रुवारी (हिं.स.)। - लव लातूर जीव लातूर संचलित कर्तव्यदक्ष सेवाभावी संस्थेच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त आयोजित भव्य रक्तदान शिबिरास रक्तदात्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला असून छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे घेण्यात आले
छत्रपती शिवाजी महाराज जयंती


लातूर, 19 फेब्रुवारी (हिं.स.)।

- लव लातूर जीव लातूर संचलित कर्तव्यदक्ष सेवाभावी संस्थेच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त आयोजित भव्य रक्तदान शिबिरास रक्तदात्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला असून छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे घेण्यात आलेल्या शिबिरात १०१ रक्तदात्यांनी या महत्वपूर्ण सामाजिक उपक्रमात रक्तदान करीत छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन केले.

छत्रपती शिवाजी महाराज सार्वजनिक जयंती महोत्सव समिती, लव लातूर जीव लातूर यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत युवकांनी स्वेच्छेने रक्तदान केले. शिबिराचे उद्घाटन मनपा उपायुक्त डॉ. पंजाबराव खानसोळे, उपविभागीय पोलीस अधिकारी समीरसिंह साळवे यांनी केले. याप्रसंगी उमेश कांबळे, हंसराज जाधव, उमाकांत धावारे यांची उपस्थिती होती. रक्तदान शिबिरासाठी श्रीमती सरस्वती कराड रक्तपेढीचे विकास कारंजे यांचे विशेष सहकार्य लाभले.

रक्तदान शिबिरातून मिळालेल्या रक्ताचा उपयोग थॅलेसेमिया, दुर्घटना पीडित, शस्त्रक्रिया, गर्भवती माता आणि कॅन्सर पीडितांना जीवनदान देण्यासाठी केला जाईल अशी माहिती शिबिराच्या आयोजकांनी दिली. सौरभ पाटील, मंथन राठोड, प्रशांत सुरवसे, विद्यानंद चव्हाण, सैफ सय्यद यांनी या शिबिरासाठी विशेष प्रयत्न केले. तसेच लव लातूर जीव लातूर, सार्वजनिक जयंती महोत्सव समितीच्या पदाधिकाऱ्यांनी शिबिराच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.

---------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande