

अकोला, 19 फेब्रुवारी (हिं.स.)।
छात्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त अकोला महानगरपालिकेच्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर मुख्य सभागृह येथे आयोजित कार्यक्रमामध्ये सर्वप्रथम मनपा आयुक्त डॉ.सुनिल लहाने आणि उपमहापौर अमोल गोगे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून माल्यार्पण करण्यात आले. तदनंतर पीएम श्री मनपा सेमी इंग्रजी मुलांची शाळा क्र. 26, शिवसेना वसाहत, पीएम श्री मनपा सेमी इंग्रजी मुलांची शाळा क्र. 7, रामदास पेठ, अकोला, मनपा मराठी मुलांची शाळा क्र. 22, मनपा मराठी मुलांची शाळा क्र. 4 मनपा मराठी मुलांची शाळा क्र. 16, मनपा मराठी मुलांची शाळा क्र. 19, हिंदी बालक शाळा क्र. 6 सिंधी हिंदी बालक शाळा क्र. 1 या शाळेच्या विद्यार्थ्यांव्दारे सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते तसेच विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवून छात्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित गीत, पोवाडे, नृत्य चे सादरीकरण करून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले.
---------------
हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे