रत्नागिरीत शिवाजी महाराजांच्या स्मारकास पोलीस बँड पथकासह मानवंदना
रत्नागिरी, 19 फेब्रुवारी, (हिं. स.) : छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त आज रत्नागिरीत प्रथमच छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकास पोलीस बँड पथकाने मानवंदना दिली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकास पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांच्या हस्ते पुष्पहा
रत्नागिरीत पोलीस बँड पथकाची शिवरायांना मानवंदना


रत्नागिरी, 19 फेब्रुवारी, (हिं. स.) : छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त आज रत्नागिरीत प्रथमच छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकास पोलीस बँड पथकाने मानवंदना दिली.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकास पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. त्यानंतर पोलीस बँड पथकाने मानवंदना करत शिवाजी महाराजांच्या शौर्य, पराक्रम व स्वराज्याच्या विचारांना आदरांजली वाहिली.यावेळी अपर पोलीस अधीक्षक बी. बी. महामुनी, पोलीस अधिकारी, अंमलदार, पोलीस बँड पथक तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी


 rajesh pande