अकोला - कत्तलीसाठी नेणाऱ्या गोवंशांची पोलिसांनी केली सुटका
अकोला, 21 फेब्रुवारी (हिं.स.)। अवैध गोवंश जातीचे जनावराची कत्तल करण्याचे हेतूने निर्दयीपणे बांधुन व कोंबुन वाहतुक करणाऱ्या दोन वाहणातुन एकुण १४ गोवंश जनावरांची पोलीसांनी सुटका करून दोन वाहणासह एकुण १२,४३,०००/- रू. चा मुद्देमाल हस्तगत करून आरोपी यास
Photo


अकोला, 21 फेब्रुवारी (हिं.स.)। अवैध गोवंश जातीचे जनावराची कत्तल करण्याचे हेतूने निर्दयीपणे बांधुन व कोंबुन वाहतुक करणाऱ्या दोन वाहणातुन एकुण १४ गोवंश जनावरांची पोलीसांनी सुटका करून दोन वाहणासह एकुण १२,४३,०००/- रू. चा मुद्देमाल हस्तगत करून आरोपी यास अटक करण्यात आली.

आज रोजी गोपणीय बातमीदार यांचे मार्फत मिळालेल्या माहीती वरून पोस्टे खदान हददीत नाकाबंदी दरम्यान १) वाहण क. MH 30 BD 3840 व २) वाहण क. MH 30 BD 5508 अशा दोन्ही चार चाकी वाहण चालकास हाताने थांबण्याचा ईशारा देवुन वाहण थांबले असता सदर वाहणाची पाहणी केली असता दोन्ही गाडीमध्ये एकुण १४ गोवंश जातीचे जनावरे यांना कत्तल करण्याचे इराद्याने निर्दयतेने बांधुन व कोंबुन वाहतुक करतांना मिळुन आल्याने गोवंश जनावरांची सुटका करून एकुण १२,४३,०००/- रूपयेचा मुददेमाल कारवाई दरम्यान जप्त करून आरोपी १) नामे जुबेर अहमद जान मोहमद रा कुरेशी नगर भाजी मंडी कामटी नागपुर २) चालक शेख अमिर शेख जमीर वय ३२ वर्षे, ३) मोहम्मद खलीक शेख इदलीस वय २२ वर्षे दोन्ही रा. शिवाजीनगर जुनेशहर अकोला यांचविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला असुन पुढील तपास चालु आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे


 rajesh pande