रायगड पोलिसांची विशेष वाहतूक मोहीम: 193 नियमभंग करणाऱ्यांवर दंड
रायगड, 21 फेब्रुवारी 2026 (हिं.स.) । रायगड जिल्ह्यातील 28 पोलीस ठाण्यांच्या अंतर्गत 20 फेब्रुवारी रोजी वाहतूक शाखेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी विशेष मोहीम राबवून वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध व्यापक कारवाई केली. या मोहीमेत एकूण 193 व
SP


रायगड, 21 फेब्रुवारी 2026 (हिं.स.) । रायगड जिल्ह्यातील 28 पोलीस ठाण्यांच्या अंतर्गत 20 फेब्रुवारी रोजी वाहतूक शाखेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी विशेष मोहीम राबवून वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध व्यापक कारवाई केली.

या मोहीमेत एकूण 193 वाहनचालकांवर कायदेशीर दंडात्मक कारवाई करण्यात आली असून त्यांच्याकडून 3,81,200 रुपये इतका दंड वसूल करण्यात आला आहे. मोहीम मुख्यत्वे हेल्मेट न वापरणे, सीटबेल्ट न लावणे, मोबाईलचा वापर करत वाहन चालवणे, सिग्नल तोडणे, क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी वाहून नेणे आणि अतिवेगाने वाहन चालविणे यांसारख्या नियमभंगांवर लक्ष केंद्रित करत होती.

वाहतूक कोंडी कमी करणे आणि अपघातांची संख्या आटोक्यात ठेवणे हा या मोहिमेचा मुख्य उद्देश असल्याचे पोलिसांनी सांगितले. शहर व ग्रामीण भागातील महत्त्वाच्या चौकांमध्ये नाकाबंदी करून तपासणी करण्यात आली. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांना फक्त दंड नाही तर समुपदेशनही देण्यात आले.

वाहतूक शाखेकडून नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे की, वाहतूक नियम पाळा आणि स्वतःची व इतरांची सुरक्षितता सुनिश्चित करा. पोलिसांनी स्पष्ट केले की भविष्यातही अशा प्रकारच्या विशेष मोहिमा सातत्याने राबविल्या जातील आणि नियमभंग करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल.-----------------------

हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके


 rajesh pande