अकोला : बलात्कार प्रकरणी आरोपीस २० वर्षाची सक्तमजुरी
अकोला, 21 फेब्रुवारी (हिं.स.)।अकोल्यातील जिल्हा व सत्र न्यायालयाने आज एका बलात्कार प्रकरणात दोषी आरोपीला 20 वर्षाच्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे.. पोलिस स्टेशन बार्शिटाकळी येथील दाखल अप क ५३/२०२३ कलम ३७६, ३७६ अ, ब, ३७७ भादवी सह कलम ४,५, एम, ६,८
अकोला : बलात्कार प्रकरणी आरोपीस २० वर्षाची सक्तमजुरी


अकोला, 21 फेब्रुवारी (हिं.स.)।अकोल्यातील जिल्हा व सत्र न्यायालयाने आज एका बलात्कार प्रकरणात दोषी आरोपीला 20 वर्षाच्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे.. पोलिस स्टेशन बार्शिटाकळी येथील दाखल अप क ५३/२०२३ कलम ३७६, ३७६ अ, ब, ३७७ भादवी सह कलम ४,५, एम, ६,८ पोक्सो कायदया मधील आरोपी अन्वेश सिध्दार्थ पवार वय २५ वर्ष रा वाघाळी, ता. बार्शिटाकळी जि. अकोला या गुन्ह्यात आरोपी असुन त्यावे विरूध्द दिनांक १२.०२.२०२३ रोजी फिर्यादी/ पिडीता यांनी पो.स्टे.ला जबाणी रिपोर्ट दिला कि दिनांक ११.०२.२०२३ रोजी दुपारी १२.३० वाजताचे सुमारास फिर्यादी हि घरी काम करीत होती व तिची मुलगी पिडीता हि बाहेर खेळत होती काम संपल्यावर फिर्यादिने तिच्या मुलीला आवाज दिला ति दिसुन न आल्याने तिला शोधत असता सिध्दार्थ पवार यावे घराजवळ सेंट्रो कार निळया रंगाची उभी होती. तेव्हा अमोल पवार याने फिर्यादीला सांगीतले की पिडीता हि कारमध्ये खेळत होती असे सांगीतले. तेव्हा फिर्यादी हि निळयारंगाचे कार जवळ गेली कारचा दरवाजा उघडत नव्हता. काचाला काळयारंगाचा कागद लावलेला होता. फिर्यादीने कारच्या पाठीमागील सिटच्या डाव्या बाजुकडील एका ठिाकानी अर्धवट निघालेल्या कागदाच्या बाजुकडुन आतमध्ये पाहले असता पिडीता हि आतमध्ये होती व तिच्या सोबत आरोपी अन्वेष सिध्दाथे पवार हा होता पिडीता अर्धवट समोर वाकलेली दिसली व अंगातील पॅन्ट अर्धवट खाली फिर्यादिला दिसली. फिर्यादिला संशय आल्याने तिने गाडीचे काचावर थापा मारल्यानंतर आरोपीने ४ते ५ मिनटांनी कारचा दरवाजा उघडला. आरोपिला विचारपुस केली असता त्याने उडवाउडविचे उत्तरे दिली तेव्हा पिडीताला फिर्यादीने घरी नेउन विश्वासात घेउन विचारपुस केली असता तिने सांगीतले दादा मला सोड असे बोलले परंतु दादाने मला सोडले नाही. असे सांगुन पिडीता फार घाबरलेली होती. पुन्हा तिला थोडयावळाने विचारले असता तिने फिर्यादिस घडलेली हकीकत सांगीतली व पिडीतावर अत्याचार केल्याचे समजल्याने फिर्यादिने तिच्या पतीला घरी बोलावुन घेतले व हकिकत सांगीतली त्यानंतर ते व पिडीता हे ग्राम निबी येथे गेले व दुपारी पिडीताहि सावरल्यासारखी वाटली म्हणुन फिर्यादी, तिचे पती व पिडीता हिस सोबत घेवुन पोलिस स्टेशन बार्शिटाकळी ला तकार केली वरून पोलिस स्टेशन ला अप क ५३/२०२३ कलम ३७६,३७६ अ, ब, ३७७ भादवी सह कलम ४,५, एम, ६, ८ पोक्सो कायदयानुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर गुन्हयाचा तपास सहा. पो. निरीक्षक स्मीता पाटील यांनी योग्य रित्याकरून तपासाअंती सदर प्रकरणी मा न्यायालयात दोषारोप पत्र आरोपी विरूध्द दाखल करण्यात आले होते.

सदर गुन्हयाचे दोषारोपावरून न्यायालयामध्ये साक्षिदारांच्या साक्ष नोंदविण्यात आल्या होत्या त्यामध्ये आरोपी अन्वेष सिध्दार्थ पवार वय २५ रा वाघझळी याचे विरुध्द गुन्हा सिध्द झाल्याने कलम ३,४ पोक्सो कायदयानुसार १० वर्ष सक्तमजुरी शिक्षा व १०००० रू दंड, दंड न भरल्यास ०१ महिना साधी कैद, कलम ५, एम, पोक्सो कायदयामध्ये २० वर्ष सक्त मजुरी शिक्षा व २०००० रू दंड दंड न भरल्यास ०२ साधी कैद कारावासाची शिक्षा सुनावली तसेच पिडीताला नुकसान भरपाई ३०००० रुपये देण्याचे आदेशात नमुद केले आहे. सरकार पक्षाची बाजु के. जि. महाजन सरकारी अभियोक्ता यांनी मांडली आहे. सदर प्रकरणात कोर्ट पैरवी अधिकारी म्हणुन ए. एस आय पाचपोर, सिएम एस सेल व पोहेकॉ कीसनराव पातोंड, ए.एस आय पिंजरकर यांनी योग्य प्रकारे कोर्ट पैरवी कामकाज पाहीले

प्रकरणी अर्चित चांडक पोलिस अधिक्षक अकोला, चंद्रकांत रेडडी, अपर पोलिस अधिक्षक, अकोला, गजानन पडघान उपविभागीय पोलिस अधिकारी अकोला ठाणेप्रभारी बार्शिटाकळी धुमाळ यांनी खटल्यादरम्याण दोषसिध्दी करीता योग्य मार्गदर्शन मार्गदर्शन केले होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे


 rajesh pande