
अकोला, 21 फेब्रुवारी (हिं.स.)। अकोल्यात गाडीच्या डिक्कीमध्ये ठेवलेले पैसे चोरणाऱ्या चोरट्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत..मिळालेल्या माहितीनुसार फिर्यादी सुशांत जयंता बल्लाळ वय ४२ वर्ष १.१६ नंबर प्राथमिक मराठी शाळा, अंबिका नगर अमरावती, यांनी पोलीस स्टेशन रामदासपेठ अकोला येवुन जबानी रिपोर्ट दिला की, फिर्यादी ने स्टेट बैंक मुख्य शाखा टॉवर चौक अकोला येथुन त्याच्या खात्यातील चेक द्वारे ३,००,०००/- रू रोख त्याचे एकुण ५०० रू च्या नोटांचे ०६ बंडल काढून त्यांच्या प्लेजर गाडी क MH 30V 7846 गाडीच्या डिक्कीमध्ये ठेवले व मित्रासोबत आय. सी. आय. सी. आय. बैंक टिळक रोड येथील ए.टी.एम. समोर त्यांची प्लेजर गाडी उभी करून फिर्यादी व त्यांचे मित्र आय. सी. आय. सी. आय, बैंक मध्ये गेले. व बेंग मध्ये आरटीजीएस करणे करीता प्लेजर गाडीच्या डिक्की मधुन पैसे काढण्याकरीता गाडीची डिक्की उघडली असता डिक्की मध्ये ३,००,०००/-रू रोख मिळून आले नाही. फिर्यादी च्या गाडीच्या डिक्कीतुन कोणीतरी अज्ञात चोराने आय.सी.आय.सी.आय. बँकेच्या समोरून गाडी उभी असतांना गाडीच्या डिक्कीतुन पैसे चोरून नेले आहे. अशा तक्रारी वरून पोलीस स्टेशन ला अप क २३५/२०२६ कलम ३०३ (२) BNS गुन्हा दाखल करून तपासात घेतला.
सदर गुन्हयाचे तपासात आरोपी नामे (१) प्रशांत भास्कर गुजांळा वय ३० वर्ष रा. सोळुरपेढा, इद्रमा नगर, जिल्हा वेलुर, राज्य आध्रप्रदेश, (२) डेनियला बैलप्पा गोगाला वय ५३ वर्ष रा. सोळुरपेढा, इदमा नगर, जिल्हा वेलुर, राज्य आध्रप्रदेश यांना स्थानिक गुन्हे शाखा अकोला यांनी निःस्पन्न केले होते. त्यानंतर तांत्रिक विश्लेषण वरून प्रोडक्शन वारंट वर ताब्यात घेवुन वर नमुद गुन्हे संबंधाने विश्वासात घेवुन सखोल चौकशी केली असता तसेच आरोपीतांना हिंदी व इंग्रजी भाषा येत नसुन फक्त त्यांची तेलगु भाषा येत असल्याने तेलगु भाषा जाणकार दुभाषी यांची मदत घेवुन गुन्हे संबंधाने विचारपुस केली असता आरोपीतांनी सदर चा गुन्हा केल्याची कबुली दिली तसेच आरोपीलांनी चोरी केलेले ३,००,०००/- रूपयेमधुन १,००,०००/ रु त्यांचे ०२ साथीदार घेवुन गेले व उर्वरीत २,००,०००/- रु आरोपीतांनी वाशिम रोड ने जातांना एका बंद होटेल चे पाठीमागे मातीच्या ढीगा-यात लपवुन ठेवले होते ते आरोपीतांकडुन जप्त करण्यात आले तसेच उर्वरीत ०२ फरार आरोपीतांचा शोध घेणे सुरू आहे
सदरची कार्यवाही ही अर्चित चांडक पोलीस अधीक्षक अकोला, अपर पोलीस अधीक्षक बी. चंद्रकांत रेड्डी, सुदर्शन पाटील उपविभागीय पोलीस अधिकारी शहर विभाग, स्थानिक गुन्हे शाखा प्रमुख शंकर शेळके अकोला यांचे मार्गदर्शना खाली पोलीस निरीक्षक शिरीष खंडारे, पोउपनि प्रदिप जोगंदड, निलेश गायकवाड, दादाराव टापरे, पोकों श्याम मोहळे, अनिल धनभर, मपोकों प्रियंका बागडे, माथुरी लाहोळे सर्व पोस्टे रामदासपेठ, अकोला यांनी केली आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे