पोयनाड येथे घरफोडी प्रकरणातील आरोपी अटकेत
रायगड, 21 फेब्रुवारी (हिं.स.)। पोयनाड पोलीस ठाणे हद्दीत मौजे गट, पोयनाड ता. अलिबाग येथील महिला फिर्यादी यांच्या घरी घरफोडीची घटना घडली. आरोपी रा. जुनेदेहेन, ता. अलिबाग याने फिर्यादी यांच्या घराच्या न बसविलेल्या खिडकीच्या मोकळ्या जागेतून घरात प्रव
POYNAD


रायगड, 21 फेब्रुवारी (हिं.स.)। पोयनाड पोलीस ठाणे हद्दीत मौजे गट, पोयनाड ता. अलिबाग येथील महिला फिर्यादी यांच्या घरी घरफोडीची घटना घडली.

आरोपी रा. जुनेदेहेन, ता. अलिबाग याने फिर्यादी यांच्या घराच्या न बसविलेल्या खिडकीच्या मोकळ्या जागेतून घरात प्रवेश केला. त्यानंतर लोखंडी तिजोरी कपाटातील चावीच्या सहाय्याने तिजोरीचे लॉकर उघडून लॉकरमधील 3,50,000 रुपये किमतीचे 25.380 ग्रॅम वजनाचे सोन्याचे गंठन फिर्यादी यांच्या संमतीशिवाय लबाडीच्या इराद्याने चोरून नेले.सदर प्रकरणातील आरोपीस दिनांक 20 फेब्रुवारी 2026 रोजी सायं. 5:53 वाजता अटक करण्यात आली आहे.याबाबत पोयनाड पोलीस ठाण्यात गु.र.नं. 26/2026 अन्वये भारतीय न्याय संहिता कलम 331(3), 331(4), 305 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सफौ/ म्हात्रे करीत आहेत

---------------

हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके


 rajesh pande