
रायगड, 21 फेब्रुवारी (हिं.स.)। पेण पोलीस ठाणे हद्दीत मौजे वाशीनाका येथे वाशीगावकडे जाणाऱ्या रस्त्यावर अपघाताची घटना घडली. फिर्यादी रा. कुरूळ ता. अलिबाग हे त्यांच्या ताब्यातील मो.सा. क्र. एमएच 06 / बीएफ 9822 ही दुचाकी पेण ते वाशीनाका अशी स्वतः चालवत येत असताना, त्यांच्या मागून येणारी मो.सा. क्र. एमएच 06 / सीएस / 0955 या दुचाकीवरील अनोळखी आरोपी चालकाने रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून तीन इसमांना बसवून वाहन अतिवेगाने, हयगयीने व बेदरकारपणे चालवले.
दरम्यान आरोपी चालकाने फिर्यादी यांच्या दुचाकीस पाठीमागून धडक दिली. या अपघातात फिर्यादी यांच्या डाव्या पायाला दुखापत झाली आहे.याप्रकरणी पेण पोलीस ठाण्यात गु.र.नं. 26/2026 अन्वये मोटार वाहन अधिनियम 1988 चे कलम 184, 128/177 तसेच भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 281, 125(A) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोह/ संदीप शिरगावकर करीत आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके