शहरातील वाहनचालक नजरकैदेत! आयुक्तालयाची ई-चलन मोहीम सुरू
City drivers under house arrest
शहरातील वाहनचालक नजरकैदेत! आयुक्तालयाची ई-चलन मोहीम सुरू


सिग्नल तोडणे पडणार महागात - एसीपी शिंदे

नाशिक, 21 फेब्रुवारी (हिं.स.) :शहरातील वाढती बेशिस्त वाहतूक रोखण्यासाठी नाशिक पोलीस आयुक्तालयाच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या ई-चलन मोहिमेचा पहिल्याच दिवशी प्रभावी परिणाम दिसला. पहिल्या दिवशी वीस वाहनचालकांवर तत्काळ कारवाई करण्यात आली.दि. 21 फेब्रुवारी रोजी सकाळी 9 ते सायंकाळी 7 पर्यंतशहरातील विविध चौकांवरील हाय-रिझोल्युशन सीसीटीव्ही कॅमेर्यांत सहाशेहून अधिक नियमभंग नोंदवले गेले. त्यांपैकी नियंत्रण कक्षातून 150 वाहनधारकांना तत्काळ ई-चलन पाठवण्यात आले. चलनाचा संदेश मिळताच अनेक वाहनचालकांनी चौकशीसाठी आयुक्तालयात धाव घेतली.20 फेब्रुवारीपासून शहरातील 40 प्रमुख सिग्नलवर हाय रिझोल्यूशन सीसीटीव्ही कॅमेरे कार्यान्वित करण्यात आले आहेत. तेथे ई-चलन प्रणाली लागू करण्यात आली आहे. सायंकाळपर्यंत 150 वाहनचालकांवर डिजिटल पुराव्यांच्या आधारे कारवाई झाली.सीसीटीव्हीत सिग्नल तोडणे, झेब्रा क्रॉसिंग ओलांडणे, ट्रिपल सीट, अनधिकृत यू-टर्न, हेल्मेट किंवा सीटबेल्ट न लावणे, तसेच मोबाइलवर बोलत वाहन चालवणे असे प्रकार स्पष्टपणे नोंदले गेले. संबंधित वाहन क्रमांकावर दंडाचा संदेश पाठवून कारवाई करण्यात आली. पोलीस नाहीत या समजुतीवर नियम मोडणार्यांना तंत्रज्ञानाने थेट गाठले, असे चित्र दिसले.यापूर्वी वाहतूक कारवाई मोठ्या प्रमाणावर मनुष्यबळावर अवलंबून होती. मात्र, नव्या प्रणालीमुळे 24 तास नियंत्रण कक्षातून देखरेख ठेवली जात असून, फोटो व व्हिडीओ स्वरूपातील डिजिटल पुरावे तत्काळ प्रणालीत नोंदवून ई-चलन जारी केले जात आहे. पहिल्या टप्प्यात शहरातील 40 प्रमुख चौक नजरकैदेत आले असून, पुढील काळात या मोहिमेची व्याप्ती आणखी वाढवण्यात येणार असल्याचे पोलीस आयुक्तालयाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

यावर बोलताना वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलीस आयुक्त अव्दीता शिंदे यांनी सांगितले की, शहरातील वाहतुकीला शिस्त लागावी हा या पाठीमागचा हेतू आहे. वाहन चालकांना काही दिवस तरी वाहनांसह नियम मोडणे हे महागात पडणार आहे . कारवाई करणे हा प्रमुख हेतू नाही पण वाहतुकीला शिस्त लावणे त्यातून शहराची दिशा वाहतुकीच्या दृष्टिकोनातून निश्चित करणे हा हेतू प्रमुख आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV


 rajesh pande