
लातूर, 21 फेब्रुवारी (हिं.स.)
: संत
नामदेव महाराजषष्ठशतकोत्तर अमृत महोत्सवी संजीवन
समाधी सांगता सोहळा, संत ज्ञानेश्वर महाराजसप्तशतकोत्तर
जन्मोत्सव सांगता महोत्सव आणिजगद्गुरु
तुकाराम महाराजत्रिशतकोत्तर अमृत महोत्सवी वैकुंठ गमन
सोहळ्याच्या निमित्ताने लातूर तालुक्यातील खंडापूर परिसरात २२ फेब्रुवारी ते २
मार्च २०२६ दरम्यान वारकऱ्यांचा भव्य सत्संग सोहळा आयोजित करण्यात आला आहे.
या
सोहळ्यानिमित्त सहा थोर संतांच्या पादुकांचे लातूर येथे आगमन झाले. हजारो संत,
वारकरी आणि भाविकांच्या उपस्थितीत
निघालेल्या भव्य दिंडीतून या पादुका कार्यक्रमस्थळी मोठ्या उत्साहात पोहोचल्या.
टाळ-मृदंगाच्या गजरात, हरिनामाच्या
घोषात आणि भक्तिमय वातावरणात दिंडीचे स्वागत करण्यात आले.
दहा
दिवस चालणाऱ्या या सत्संग सोहळ्याची सुरुवात आनंद, भक्तीभाव आणि उत्साहपूर्ण वातावरणात
झाली असून, विविध धार्मिक
कार्यक्रम, कीर्तन, प्रवचन आणि भजनांच्या माध्यमातून वारकरी
संप्रदायाची परंपरा जपली जाणार आहे. या कालावधीत हजारो भाविक उपस्थित राहणार
असल्याची माहिती आयोजकांकडून देण्यात आली आहे.खंडापूर परिसरात या सोहळ्यामुळे भक्तिमय
वातावरण निर्माण झाले असून, प्रशासनाकडून
आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
-----------------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis