एफआयएच प्रो लीग : स्पेनची भारतावर २-० ने मात
होबार्ट, 21 फेब्रुवारी (हिं.स.) होबार्ट येथे झालेल्या एफआयएच पुरुषांच्या प्रो लीग सामन्यात स्पेनने भारताचा २-० असा पराभव केला. या हंगामात एफआयएच प्रो लीगमध्ये भारताचा हा सलग पाचवा पराभव ठरला आहे. भारताने सामन्याची सुरुवात वेगवान आणि जलद पासिंगने के
स्पेनचा हॉकी संघ


होबार्ट, 21 फेब्रुवारी (हिं.स.) होबार्ट येथे झालेल्या एफआयएच पुरुषांच्या प्रो लीग सामन्यात स्पेनने भारताचा २-० असा पराभव केला. या हंगामात एफआयएच प्रो लीगमध्ये भारताचा हा सलग पाचवा पराभव ठरला आहे. भारताने सामन्याची सुरुवात वेगवान आणि जलद पासिंगने केली होती. सुरुवातीलाच चेंडूवर ताबा मिळवण्याचा प्रयत्नही केला. पण स्पेनचा संघा भारतापेक्षा वरचढ ठरला. इग्नासियो अबाजो (६ व्या मिनिटाला) ने अशाच एका चालीचा फायदा घेतला आणि चेंडू नेटमध्ये वळवून स्पेनला सुरुवातीलाच आघाडी मिळवून दिली.

पराभवाची भीती न बाळगता भारतानेही आपला आक्रमक खेळ कायम राखला आणि स्पेनची बचावफळी भेदण्याचा प्रयत्न केला. पहिल्या क्वार्टरच्या शेवटी अभिषेकने जोरदार स्ट्राइक मारला तेव्हा त्याने आपल्या संघासाठी बरोबरीचा गोल जवळपास गाठला होता. पण स्पॅनिश गोलकीपर लुईस कॅलझाडोने केलेल्या उत्कृष्ट बचावामुळे भारतीय संघ गोल करण्यात अपयशी ठरला. आणि स्पेनने हाफटाइममध्ये १-० अशी आघाडी घेतली.

खेळ पुन्हा सुरू झाल्यानंतर लगेचच, सूरज करकेराने एक शानदार बचाव केला कारण स्पेन आक्रमकपणे मैदानात उतरला आणि आपली आघाडी वाढवण्याचा प्रयत्न केला. इग्नासियो कोबोस (३६') ने जवळून गोल करून स्पेनची आघाडी दुप्पट केली तेव्हा त्यांचा दबाव अखेर यशस्वी झाला. तिसऱ्या क्वार्टरच्या शेवटच्या टप्प्यात स्पेनने पाच पेनल्टी कॉर्नर मिळवले. पण भारताच्या बचावफळीने त्यांना गोल करण्यापासून रोखले. दरम्यान, सामन्याच्या शेवटी भारतीय संघाने आक्रमक खेळ केला खरा पण गोल करण्यात त्यांना यश आले नाही आणि अखेर स्पेनने २-० ने हा सामना जिंकला. आता रविवारी एफआयएच प्रो-लीगमध्ये भारताचा सामना यजमान ऑस्ट्रेलियाशी होणार आहे.

हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे


 rajesh pande