अकोला: अनुदान थकबाकीवर शेतकऱ्यांचा मुख्य कार्यकारी अधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
अकोला, 26 फेब्रुवारी 2026 (हिं.स.) अकोल्याच्या पातुर तालुक्यातील चान्नी येथील शेतकऱ्यांनी तीन वर्षापासून वृक्ष लागवडीच्या अनुदानापासून वंचित राहिल्याने, राजा ग्रुपच्या वतीने आज अकोला जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी कार्यालयासमोर सात तास
Photo


अकोला, 26 फेब्रुवारी 2026 (हिं.स.) अकोल्याच्या पातुर तालुक्यातील चान्नी येथील शेतकऱ्यांनी तीन वर्षापासून वृक्ष लागवडीच्या अनुदानापासून वंचित राहिल्याने, राजा ग्रुपच्या वतीने आज अकोला जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी कार्यालयासमोर सात तास ठिय्या आंदोलन केले.

शनिवारच्या आंदोलनात शेतकऱ्यांनी सांगितले की, त्यांनी 2023 च्या जून महिन्यात चंदन व सरू वृक्षांची लागवड केली होती, परंतु तीन वर्ष उलटूनही शासनाकडून अनुदानाची रक्कम त्यांच्या खात्यात जमा झालेली नाही.

शेतकऱ्यांनी यापूर्वीही तक्रारी करून, उपोषण करून आणि संबंधित अधिकाऱ्यांकडे विनंती करून रक्कम मिळवण्याचा प्रयत्न केला, पण दखल घेतली गेली नाही. त्यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी अनुदान तात्काळ मंजूर करण्याची मागणी करत सात तास ठिय्या आंदोलन केले.

-------------------

हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे


 rajesh pande