सण-उत्सवासाठी ध्वनीक्षेपक वापरास सूट
परभणी, 26 फेब्रुवारी (हिं.स.)। जिल्हयात ३१ डिसेंबर पर्यंत काही सण उत्सवाच्या काळात ध्वनीची विहीत मर्यादा राखून सकाळी ६ ते रात्री १२ वाजेपर्यंत ध्वनीवर्धक व ध्वनीक्षेपक वापरास सुट देण्यात देण्यात आलेली आहे. जिल्हादंडाधिकाऱ्यांनी संजयसिंह चव्हाण
सण-उत्सवासाठी ध्वनीक्षेपक वापरास सूट


परभणी, 26 फेब्रुवारी (हिं.स.)।

जिल्हयात ३१ डिसेंबर पर्यंत काही सण उत्सवाच्या काळात ध्वनीची विहीत मर्यादा राखून सकाळी ६ ते रात्री १२ वाजेपर्यंत ध्वनीवर्धक व ध्वनीक्षेपक वापरास सुट देण्यात देण्यात आलेली आहे. जिल्हादंडाधिकाऱ्यांनी संजयसिंह चव्हाण यांनी दिलेल्या आदेशानुसार ईद - ए - मिलाद, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती, महाराष्ट्र दिन, गोपाळकाला (दहीहंडी), ख्रिसमस आणि ३१ डिसेंबर या दिवशी प्रत्येकी एक दिवस सवलत दिली. तर गणपती उत्सव (श्री गणेश चतुर्थी व अनंत चतुर्दशी) आणि दिवाळी (लक्ष्मीपूजन व दिवाळी पाडवा) या उत्सवांसाठी प्रत्येकी २ दिवसांची मुभा आणि नवरात्री उत्सवासाठी (घटस्थापना, सप्तमी, अष्टमी, नवमी)४ दिवसांची मुभा देण्यात आली आहे.ही सवलत ध्वनी प्रदूषण (नियमन व नियंत्रण) अधिसूचनेत नमूद केलेल्या ध्वनी मर्यादा व इतर अटींचे पालन करूनच लागू राहील. नियमांचे उल्लंघन होणार नाही, याची दक्षता घ्यावी, असे आदेशात नमूद केले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande