
लातूर, 26 फेब्रुवारी (हिं.स.)। लातूर जिल्ह्यातील गुन्हेगारीवर वचक निर्माण करण्यासाठी लातूर पोलीस दलाने मोठी कारवाई केली आहे. अनेक गंभीर गुन्ह्यांत सहभागी असलेला सराईत गुन्हेगार अमोल ज्योतीराम गंभीरे (वय २६, रा. सिकंदपूर) याच्यावर एमपीडीए (MPDA) कायद्यांतर्गत कारवाई करून त्याला एक वर्षासाठी स्थानबद्ध करण्यात आले आहे.
गुन्हेगारी पार्श्वभूमी:- आरोपीवर लातूर शहरातील विविध पोलीस ठाण्यांत खुनाचा प्रयत्न, चोरी आणि मारामारी यांसारखे एकूण १५ गंभीर गुन्हे दाखल आहेत.
प्रशासकीय कारवाई:- पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांच्या सूचनेनुसार, लातूर ग्रामीण पोलिसांनी या गुन्हेगाराविरुद्धचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर केला होता.
स्थानबद्धता : जिल्हाधिकाऱ्यांनी या प्रस्तावास मंजुरी दिली असून, २० फेब्रुवारी २०२६ रोजी आरोपीला एक वर्षासाठी स्थानबद्ध करण्याचे आदेश दिले.
कारागृहात रवानगी:- २५ फेब्रुवारी रोजी आरोपीला ताब्यात घेऊन त्याची हर्सूल मध्यवर्ती कारागृह (छत्रपती संभाजीनगर) येथे रवानगी करण्यात आली आहे.
पोलीस प्रशासनाचा इशारा:- नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आणि कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींवर अशीच कठोर कारवाई सुरू राहील, असा इशारा पोलीस दलाने दिला आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis